अजित मांडकेठाणे : पालघर, वसई व मीरा-भार्इंदरची साथ भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना लाभल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. मात्र शिवसेनेचे संघटनात्मक जाळे घट्ट असल्याने त्या पक्षाचे उमेदवार संजय मोरे यांनी भक्कम मते मिळवली व परिणामी डावखरे यांना दुसऱ्या व तिसºया पसंतीची मते घेऊन विजय प्राप्त करावा लागला. नजीब मुल्ला यांना तिसºया क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले. मात्र ठाण्याच्या राजकारणातील डावखरे फॅक्टर संपुष्टात आणण्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांचे ‘डाव’खरे ठरले नाहीत.कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तीन मातब्बर उमेदवारांसह १४ उमेदवार रिंगणात होते. मात्र बहुमताचा कोटा कुठल्याही उमेदवाराला प्राप्त न झाल्याने पसंतीक्रमाची मते मोजावी लागली व त्यामुळे जवळपास चोवीस तासानंतर निकाल लागला. पूर्वीपासून हा मतदारसंघ भाजपाचा गड होता. तो पुन्हा काबीज करुन भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. त्याचबरोबर पालघर पाठोपाठ कोकणात सेनेला पराभूतकरुन पालकमंत्री एकनाथ शिंदेयांचा दिग्विजयी अश्वमेध रोखला आहे.शिवसेनेला वसई-पालघर, मीरा भाईंदर येथून मतांची अपेक्षा होती. तेथे डावखरे यांनाच भरभरुन मते मिळाली तसेच ‘गद्दाराला पाडा’, असा शरद पवार यांचा संदेश असतानाही राष्टÑवादी काँग्रेसमधील काही मंडळीनी वसंत डावखरे यांच्या प्रेमाखातर निरंजन यांना साथ दिली. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अनेक मुद्यांकरिता लक्षात राहणारी ठरली आहे. कधी नव्हे ते या मतदारसंघात तब्बल १ लाख ४ हजार मतदारांची नोंद झाली. त्यापैकी तब्बल ७३.८९ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यामुळे ही निवडणूक ‘काटें की टक्कर’ ठरणार हे स्पष्ट दिसत होते. डावखरे यांनी मोरे यांचा ८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. एकूण मतदानाचा अपेक्षित असलेला ५० टक्के कोटा तिघापैकी एकाही उमेदवाराने गाठला नाही. मात्र सुरुवातीपासून डावखरे आघाडीवर होते.शिवसेनेचे नेते मोरे यांना ३४ हजारांच्या आसपास मते मिळतील, असा तर भाजपाचे नेते डावखरे यांना ३५ हजार मते मिळतील, असा दावा करीत होते. मात्र दोघांनाही तेवढी मते मिळाली नाहीत. त्यामुळे आपली मते कुठे गेली, याचा अभ्यास शिवसेनेला करावा लागेल. वसईतील बाविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांचे शिवसेनबरोबर मधूर संबंध राहिले आहेत. मात्र डावखरे यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध असल्याने तेथे निरंजन यांना घसघशीत मते मिळाली. मीरा भाईंदरनेही डावखरे यांना साथ दिली. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक हे मीरा-भाईंदरचा कारभार पाहतात. डावखरे यांना पराभूत करण्याकरिता आ. जितेंद्र आव्हाड यांनी कंबर कसलेली असल्याने त्यांचे मनसुबे उधळून लावण्याकरिता डावखरे यांना छुपी साथ दिली गेली नाही नां, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.निवडणुकीत राष्टÑवादीला यश मिळविता आले नसले तरी केवळ १५ दिवसात मतदार नोंदणी करुन, दोन मातब्बर उमेदवारांना टक्कर देण्याचे नजीब मुल्ला यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. मुल्ला जेवढी मते खातील तेवढा शिवसेनेलाच फायदा होईल, असे प्रचारा दरम्यान रंगवलेले चित्र प्रत्यक्षात तसे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वसंत डावखरे यांचे आशीर्वाद, त्यांच्या सहकाºयांनी केलेले सहकार्य, पक्ष विरहीत लोकांनी केलेली मदत, भाजपाच्या सर्वच आमदार, खासदार आणि पदाधिकाºयांनी केलेली मेहनत आणि मतदारांनी विकासासाठी दिलेला कौल यामुळेच हा विजय प्राप्त झाला. यापुढे कोकणचा विकास करण्याचे ध्येय असून शिक्षकांचे प्रश्न, पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहे.- निरंजन डावखरे, विजयी उमेदवार, कोकण पदवीधर मतदारसंघमतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. परंतु मतदानाच्या दिवशी भाजपाच्या मंडळींकडून माझ्या नावासमोर तिसºया क्रमांकाचे मत द्या असाच प्रचार केला गेला. हे ठाण्यातील दोन मतदान केंद्रांवर झाले होते. त्याची तक्रार मी केली होती. त्यामुळेच ३५०० मते बाद झाली. ही मते मिळाली असती तर चित्र काहीसे निराळे असते.- संजय मोरे,पराभूत उमेदवार, शिवसेनापक्षाने निरंजनवर विश्वास दाखविला होता. परंतु ऐनवेळेस त्याने गद्दारी केली, त्यामुळे अवघड झालेल्या, या निवडणुकीसाठी कमी कालावधीत नजीब मुल्ला सारखा लढवय्या तयार झाला आणि पक्षाने त्याचावर विश्वास टाकला. या तुल्यबळ लढतीत, नजीबने १५ हजारांच्या आसपास मते घेतली. त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्टÑवादी काँग्रेस
पराभव मोरेंचा, पण हरले आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:47 AM