आविष्कार देसाई
अलिबाग : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून रायगड जिल्हा वाहतूक विभागाने ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सात ठिकाणच्या २१ शाळा आणि महाविद्यालयातील तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्यात आले आहेत. यातील प्रशंसनीय बाब म्हणजे शाळा, महाविद्यालयातील काही युवकांनी दुचाकीला स्वत:पासून दूर ठेवण्याला पसंती दिल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने छोटे-मोठे उद्योग उभे राहिले आहेत. आरसीएफ, गेल, एचपीसी, आयपीसीएल (रिलायन्स), एचओसी, पास्को यासह अन्य कंपन्यांनी येथे प्रकल्प उभे केले आहेत. वाढत्या उद्योगांमुळे येथील नागरीकरणातही वाढ होत आहे. परिणामी वाहतुकीच्या समस्याही वाढत आहेत. जिल्ह्यात असणाऱ्या स्वतंत्र वाहतूक विभागाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियोजन आणि नियंत्रण केले जाते. मात्र वाढती वाहनसंख्या त्याचप्रमाणे वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघातांचा आकडा वाढत आहे. नववी, दहावीतील मुलेही दुचाकी वापरताना दिसत असून त्यांच्याकडून बहुतांश वेळा वेगमर्यादांचे उल्लंघन होताना दिसते. वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाºया कारवाईत अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. विविध अपघातातून तसेच पोलीस कारवाईतून समोर आले आहे. त्यांना वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये मृत्यू होण्याबरोबरच अपंगत्व येण्याचेही प्रमाण चिंतेमध्ये वाढ करणारे आहे.१अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी वाहन चालवताना पोलिसांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांंच्या पालकांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामध्ये पालकांना शिक्षा आणि दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.२वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात, गुन्हे रोखता येऊ शकतात. यासाठी रायगड जिल्हा वाहतूक विभागाने ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून जनजागृतीला प्रारंभ केला आहे. यासाठी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन युवा वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे.३अलिबाग, पेण, महाड, कर्जत, खोपोली, रेवदंडा आणि मुरुड या विभागातील २१ शाळा, महाविद्यालयातील तब्बल १५ हजार युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’ राबवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.४जीवनामध्ये वाहतुकीच्या नियमांचे किती महत्त्व आहे, त्याचे पालन केल्याने काय होऊ शकते याची माहिती त्यांना देण्यात येत असल्याचे वराडे यांनी स्पष्ट केले. यासाठी अपघातांची आकडेवारी, पालकांना दंड आणि शिक्षा, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, अति वेगाने गाडी चालवण्यासारख्या विषयांवर त्यांच्याशी सखोल चर्चा करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.च्अशा विविध कार्यक्रमामुळे आता काही मुले हे शाळा, महाविद्यालयात जाताना-येताना वाहनांचा वापर करत नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी आवर्जून सांगितल्याचेही वराडे यांनी स्पष्ट केले.च्‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून लगेचच १०० टक्के फरक पडणार नाही, परंतु काही मुलांनी याचे पालन केले तर, आपल्या राष्ट्राची युवा शक्ती हकनाक अपघातात दगावणार नाही आणि हेच सक्षम राष्ट्राच्या हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले.