ग्रामीण भागातील ४० जणांवर व्यंगमुक्ती शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:35 PM2019-03-02T23:35:58+5:302019-03-02T23:36:03+5:30

कार्लेखिंड परिसरातील रुग्णालयात गेले दोन दिवस सुरू असलेल्या शिबिरात ४० जणांवर शारीरिक व्यंगमुक्ती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Deficiency surgeries on 40 patients in rural areas | ग्रामीण भागातील ४० जणांवर व्यंगमुक्ती शस्त्रक्रिया

ग्रामीण भागातील ४० जणांवर व्यंगमुक्ती शस्त्रक्रिया

Next

कार्लेखिंड : कार्लेखिंड परिसरातील रुग्णालयात गेले दोन दिवस सुरू असलेल्या शिबिरात ४० जणांवर शारीरिक व्यंगमुक्ती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्येष्ठ प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांच्या पुढाकाराने, शिबिराचे समन्वयक व भूलतज्ज्ञ डॉ. संजीव शेटकार, प्रयास रुग्णालयाचे संचालक डॉ. रवींद्र म्हात्रे, इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, मुंबई जी. टी. रुग्णालयाचे तज्ज्ञ सर्जन डॉ. सागर गुंंडेवार, डॉ. माही नूर आदी शिबिरात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी शनिवारी शिबिराला आवर्जून भेट देऊन, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण आणि त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे मुंबई व अलिबागमधील ज्येष्ठ डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधून संपूर्ण माहिती घेतली.
>ज्येष्ठ प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीतून ग्रामीण भागातील रुग्णांच्या व्यंगमुक्तीकरिता महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून देऊन रुग्णांचे जीवन परिवर्तन करीत आहेत. हे काम आदर्शवत आहे
- डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी

Web Title: Deficiency surgeries on 40 patients in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.