- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे. ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.सरकारने यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वृक्षरोपणाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच ठिकाणी, तसेच ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत झाडे पुरवण्यात येत आहेत.कर्जत तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायतीला वारे व परिसरातील वाड्या-पाड्यांवर, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा परिसरात झाडे लावण्यासाठी या विभागाकडून सुमारे १२०० रोपे देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतीकडून त्या रोपांची लागवड न करता रस्त्याच्या कडेला टाकली आहेत. त्यामुळे वारे ग्रामपंचायतीला वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याची चर्चा सर्वत्रआहे.शासनाकडून दरवर्षी झाडे लावण्यासाठी लाखो रु पये खर्च केले जातात. वृक्षतोडीमुळे निसर्गाची होत असलेली हानी, पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जातआहेत.राज्यभरात शासनाच्या विविध विभागांकडून, सामाजिक संस्थांकडून वृक्षरोपणाचे कार्यक्र म केले जातात; परंतु शासनाच्या या संकल्पनेलाच, वारे ग्रामपंचायतीकडून हरताळ फासल्याचे रस्त्यावर टाकलेल्या रोपांकडे पाहता दिसून येते.
वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 4:07 AM