पोलादपूर : गेल्या १५ दिवसांपासून महाड-पोलादपूरमध्ये बीएसएनएलची दूरध्वनी सेवा वारंवार खंडित होत असून या सेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे सर्व सामान्य संपर्कसह नेट पासून वंचित राहात आहे. त्यातच ही सेवा अधून-मधून येत असली तरी ती धीम्या गतीने असल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे.
दूरध्वनी क्षेत्रात खासगीकरण होण्यापूर्वी ग्रामीण भागासह शहरी भागात शासनाची दर्जेदार असणारी बीएसएनएलची सेवा खासगीकरणनंतर इतर कंपन्यांच्या स्पर्धेत आपला टिकाव धरत सुरू होती. मात्र, सतत्यांनी नादुरुस्तीसह अचानक ठप्प होत असल्याने अनेक नागरिकांनी हे सेवा बंद करून खासगी सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. बुधवारी अनेक बँकांसह महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात शासकीय सेवा दिमाखतील आहे. मात्र, अनेकदा ती कोलमडल्याने या कार्यालयातील कामकाज खोळंबत आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे संपर्क होत नसल्याने महत्त्वाची घटना नातेवाईक मित्रपरिवाराला कळवता येत नसल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत.
महाड, पोलादपूरमध्ये सातत्याने ही सेवा कोलमडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेच्या कामासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. बंद सेवांचे बिल ही येत असल्याने अनेक ग्राहकांनी यापूर्वी तक्रारी केल्या, तरी कर्मचारी योग्य उत्तर देत नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.