रोहा : रोहा अष्टमी शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका नदी संवर्धनाबाबत दिल्लीतून सूत्रे हालली असून, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. लवकरच नदी संवर्धनाचे काम मार्गी लागणार आहे. रोहेकारांची मागणी असलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले नामकरण प्रस्तावास केंद्रीय स्तरावर अनुकूलता असल्याचे समजते.कुंडलिका नदीचा विकास व्हावा, रोह्याचे सुपुत्र पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुंडलिकेच्या काठी पर्यटनस्थळ व्हावे, ही समस्त रोहेकरांची अनेक वर्षांची भावना आहे. जिल्ह्यात बारामाही वाहणारी कुंडलिका ही नैसर्गिक नदी आहे. त्या दृष्टीने कुंडलिकेचे संवर्धन व विकास होत नाही, कुंडलिकेचे संवर्धन करीत विकास व्हावा, असे प्रयत्न झाले, राज्य शासनाकडे अंशत: प्रस्तावाला मान्यता आहे, तरीही केंद्र शासन अखत्यारित परवानगी व भारत नदी संवर्धन अंतर्गत पूर्ण निधी मिळावा, यासाठी ठोस कार्यवाही यापूर्वी झाली नाही, अखेर संपूर्ण रोहेकरांची भावना नवीन शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना मागील काळात जाहीर बोलून दाखविली, त्याची दखल घेत अनंत गीते यांनी जल संवर्धन नदी विकास मंत्रालयाशी तातडीने पत्रव्यवहार केला. तसेच याचा सातत्याने पाठपुरावा करत संबंधितांनी योग्य प्रतिसाद दिल्याने कुंडलिका संवर्धनाबाबत दिल्लीतून सूत्रे हालली असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असल्याने रोहेकरांनी आनंद व्यक्त केला. रायगडात बारामाही वाहणाºया कुंडलिका नदीने कोलाड, रोहा व परिसराची तहान भागत आहे. आम. सुनील तटकरे यांनी नदी संवर्धनासाठी राज्याकडून मंजुरी आणली, निधी आणला, हे सांगण्यात आले होते. नदी संवर्धन व विविध परवानग्या केंद्र शासनाच्या अखत्यारित आहेत. दोन-चार कोटीने प्रस्तावित नदी संवर्धन शक्य नसल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. मोदी शासनाच्या धोरणानुसार देश, राज्यात जल संसाधन नदी विकास अंतर्गत विविध नद्यांचा विकास प्रस्तावित आहे. त्याच धोरणातून कुंडलिकेचा विकास व्हावा, पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मभूमीतील कुंडलिकेला झळाली मिळावी, नदी संवर्धन अंतर्गत तब्बल ४८ कोटींचा निधी व पर्यावरणासह सर्वच परवानग्या केंद्राच्या अंतर्भूत आहेत, ही बाब माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी शिवसेना प्रवेशकार्यक्र मात बोलून दाखविली होती, त्याची केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी तातडीने दखल घेत जल संसाधन नदी विकास मंत्रालया सोबत पत्रव्यवहार करत यासाठी पाठपुरावा केला आहे.
रोहा कुंडलिका नदी संवर्धनाबाबत दिल्लीतून सूत्रे हालली, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:07 AM