चायनामेड आकाशकंदिलांना मागणी
By Admin | Published: November 7, 2015 12:54 AM2015-11-07T00:54:46+5:302015-11-07T00:54:46+5:30
दिवाळी सहा दिवसांवर आल्याने मोहोपाडा बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून रंगीबेरंगी वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी मोहोपाडा बाजारपेठेत
मोहोपाडा : दिवाळी सहा दिवसांवर आल्याने मोहोपाडा बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून रंगीबेरंगी वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी मोहोपाडा बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. बाजारात पणत्या,आकाशकंदील, रांगोळीचे रंग, कपडे, फटाके आदी वस्तू बाजारपेठ दाखल झाल्या असून खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा चायनामेड आकाशकंदील आणि पणत्यांना मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
दिवाळी सणात दिव्यांची रोषणाई करीत फटाक्यांची आतषबाजी करून घरासमोर रंगीबेरंगी आकाश कंदील लावून रांगोळी काढली जाते. आकाशकंदिलांमध्ये आता चायनामेड आकाशकंदील बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून ग्राहक चायनामेड कंदील खरेदी करताना दिसत आहेत. बाजारात हे आकाशकंदील ४० रु पयांपासून ८०० रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत.तसेच मातीच्या पणत्यांची जागा आता विविध आकार आणि प्रकाराच्या इतर कंपन्यांच्या व चायनामेड पणत्यांनी घेतल्याने बाजारात २० ते २०० रु पये डझन मिळतात. पूर्वीच्या टिकल्या आणि लवंगी फटाके नामशेष होण्याच्या मार्गावर असून विविध रंगांमध्ये रोषणाई करणारे व कर्कश फटाके बाजारात आल्याने बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात या फटाक्यांकडे आकर्षित होत आहेत. (वार्ताहर)