आविष्कार देसाईअलिबाग : परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातल्याने शेती उद्ध्वस्त झाली असतानाच मासेमारी करणाऱ्यांचेही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे. मात्र, मासेमारीचा व्यवसाय करणाºयांना सरकारने वाºयावर सोडल्याचे चित्र आहे. शेतीच्या दुष्काळाप्रमाणे मासेमारीचा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करण्याची मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रु पयांची तरतूद केली आहे. मात्र, ‘क्यार’ वादळ आणि ‘महा’चक्रिवादळामुळे मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाबाबत भरपाईची अद्याप कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रातील क्यार आणि महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाºयांना मासेमारी करण्यासाठी जाताच आलेले नाही. त्यामुळे त्यांचे प्रतिदिन लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.जिल्ह्यामध्ये मासेमारी करणाºया लहान-मोठ्या बोटींची संख्या सुमारे १५०० पर्यंत आहेत. पैकी मोठ्या बोटींची संख्या ही ६०० च्या आसपास आहे. एक मोठी बोट वर्षाला (पावसाचा हंगाम वगळून) १४ वेळा समुद्र मासेमारीसाठी जाते. एका फेरीला किमान दहा लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले तर एका बोटीचा वर्षाला एक कोटी ४० लाख रुपयांचा व्यवसाय होतो.
नारळी पौर्णिमेनंतर खºया अर्थाने मासेमारीचा हंगाम सुरू होतो; परंतु हंगामामध्येच क्यार चक्रिवादळ आणि आता महाचक्रिवादळामुळे समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाताच आलेले नाही. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांमध्ये किमान १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अंबर नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. छोट्या बोटींच्या संख्येचा विचार केल्यास त्यांनाही कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने मदत केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.क्यार वादळापाठोपाठ महाचक्रिवादळाने थैमान घातल्याने मासेमारी व्यावसायिक उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने आमच्याकडेही लक्ष दिले पाहिजे, अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचे घटक असल्याने सरकारने आर्थिक नुकसानभरपाई दिलीच पाहिजे, असे मांडवा येथील माता टाकादेवी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनिल भिंगारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्याच्या तिजोरीमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे चार हजार कोटी रुपये जमा होतात. मात्र, ऐन हंगामातच व्यवसायाला घरघर लागल्याने संकट अधिक गहिरे झाले आहे. मासेमारीच्या प्रमुख हंगामामध्येच मासेमारी करता येत नसल्याने मासेमारी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी भिंगारकर यांनी केली.रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अशीच परिस्थिती असल्याने माशांच्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम होऊन परकीय चलनामध्ये घट होत असल्याचे राज्य मच्छीमार संघाचे अॅड. जे. टी. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मासेमारी व्यावसायिक फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. क्यार चक्रिवादळ आणि महाचक्रिवादळामुळे समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी बोटी गेलेल्या नाहीत. किनाºयावरच त्या नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोटीवरील कामगारांच्या हातालाही काम नसल्याने परराज्यातील कामगारांनी घरचा रस्ता धरल्याचेही पाटील यांनी सांगितले.मासळीचा दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या अटी आणि शर्ती बºयाच जुन्या आहेत. त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे अॅड. पाटील यांनी सांगितले. सरकारने यामध्ये बदल केला तर मासेमारी व्यावसायिकांवरील संकट दूर होईल. सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, सरकार याबाबतीमध्ये गंभीर नसल्याने सर्वांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे.- जे. टी. पाटील, वकील,राज्य मच्छीमार संघदरम्यान, क्यार आणि महाचक्रिवादळामुळे मासेमारी व्यावसायिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येईल. याबाबतची एक बैठक लवकरच आयुक्त स्तरावर होणार आहे. त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल.- अभयसिंग शिंदे, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभागअभय पाटील : बोर्ली पंचतन1परतीचा पाऊस अजूनही महाराष्ट्राची पाठ सोडत नसून क्यार चक्रिवादळ जाते ना जाते तोच आता ‘महा’ चक्रिवादळ येण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने कोकणातील शेतकरी व मच्छीमार पुन्हा काळजीत पडला आहे. शेतकºयांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे, तर ‘महा’वादळामुळे समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यास मत्स्य विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे मच्छीमारी नौका किनारी नांगरल्या गेल्याने मच्छीमार बांधव संकटात सापडला आहे. त्यामुळे मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.2अरबी समुद्रात महा नावाचे चक्रिवादळ निर्माण झाले आहे. महा चक्रिवादळ अरबी समुद्रात तयार झाल्याने किनारपट्टी भागात अतिवृष्टी होणार आहे. हे चक्रिवादळ १ ते ८ नोव्हेबरपर्यंत राहणार असून, अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा मच्छीमार बोटी समुद्रकिनारी विसावल्या जाणार आहेत.3अरबी समुद्रात महा चक्रिवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रिवादळ गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यात धडकणार असून याचा फटका राज्यांच्या किनारपट्टीला बसणार आहे. चक्रिवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आधीच शेतकºयाचे आणि मच्छीमारांचे नुकसान झाले असून पुन्हा पावसामुळे शेतकरी आणि मच्छीमार चिंतेत सापडला आहे.4चार दिवसांपूर्वी क्यार चक्रिवादळाने कोकणातील शेतकरी व मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता महा नावाच्या चक्रिवादळाचा धसका मच्छीमारांनी घेतला आहे. आधीच मत्स्य दुष्काळ त्यात डिझेलचे पैसेही वसूल होत नसल्याची खंत कोळी बांधव व्यक्त करीत आहेत. खोल समुद्रामध्ये असताना वादळाचा इशारा मिळाला की किनाºयावर यावे लागत असल्याने त्यामध्ये डिझेलसह अन्नधान्याचा खर्च वाढत असल्याने मच्छीमार बांधव पुरता मेटाकुटीला आला आहे. भातपिकांचे व बागायतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम श्रीवर्धन तालुक्यामध्ये प्रगतिपथावर आहे. तर दिघी येथील माउली व एकवीरा मच्छीमार संस्था यांनी शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम जलदगतीने सुरू असून पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या मार्फ त प्रत्येक गावामध्ये करीत आहेत. त्यामुळे मत्स्य दुष्काळाबाबत अधिक माहितीसाठी शेतकºयांनी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा.- सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धनसततच्या येणाºया वादळामुळे संरक्षित असलेल्या दिघी खाडीमध्ये गुजरात, उमरगा, कर्नाटक, मुंबई व स्थानिक रायगडच्या भागातील नौका सुरक्षित आहेत. अडचणीच्या काळामध्ये त्यांना आवश्यक मदत पुरविण्यात येईल. वादळाच्या फटका बसू नये म्हणून बोटी किनारी आल्या आहेत.- पी. एल. गुंजाळ, बंदर निरीक्षक,महाराष्ट्र मेरीटाइम बोडदिघी तसेच श्रीवर्धनमधील मच्छीमार बांधवांची सतत येणाºया समुद्रातील वादळामुळे उपाशी राहण्याची वेळ आहे. मासेमारीस गेल्यानंतर मासे न मिळणे त्यामुळे डिझेलसह कामगारांचा पगार, अन्नधान्य यांचा खर्च माथी पडत असल्याने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करून मच्छीमार बांधवांस आर्थिक मदत जाहीर करावी.- जनार्दन गोवारी,चेअरमन, माउली कृपामच्छीमार सह. संस्था, दिघी