पावसाळी वस्तूंची मागणी घटल्याने व्यवसाय मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:11 PM2019-07-23T23:11:37+5:302019-07-23T23:11:50+5:30

उष्णता वाढली : लावणीचे काम करताना शेतकरी हैराण; पावसाने पाठ फिरवल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील दुकानदारांचे नुकसान

Demand for rainy season slowed down business | पावसाळी वस्तूंची मागणी घटल्याने व्यवसाय मंदावला

पावसाळी वस्तूंची मागणी घटल्याने व्यवसाय मंदावला

Next

गणेश प्रभाळे

दिघी : गायब झालेल्या पावसाने जरा शेतकरी हवालदिल झाला आहे, तसेच बाजारपेठेतील अनेक विक्रेत्यांवरही त्यामुळे संक्रांत आली आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे पावसाशी संबंधित वस्तूंची उलाढाल थांबली आहे. छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल, प्लॅस्टिक कागद, जर्किन, गाड्यांचे कर्व्हर यांची उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील विविध गाव-शहरात पावसाळी वस्तूंची मागणी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी आहे.

दरम्यान, ऐन जून महिन्यात सुरुवातीला पडणाºया पावसाने अखेरच्या आठवड्यात पडून विश्रांती घेतली आहे. कमाल ३० तर किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. सायंकाळी काहीसा पाऊस पडला तरीही स्थिती कायम आहे. पावसाने दडी मारल्याने पावसाळ्याशी संबंधित वस्तूंचा साठा करणाºया दुकानदारांचे मात्र नुकसान होणार आहे. पावसाने दडी मारल्यामुळे या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे. पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या चपलांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. प्लॅस्टिक चप्पल, बूट, सँडल अशा वस्तू व्यापाऱ्यांनी पावसाआधीच दुकानात भरून ठेवल्या. मात्र, गेल्या महिनाभरात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने ग्राहकांनीही या वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. या वस्तूंची शहरातील प्रत्येक दुकानदाराकडे किमान पाच लाख रुपयांपर्यंतची खरेदी असते. त्यात चप्पल, बुटांसह रेनकोट, छत्र्या, गाड्यांचे कव्हर्स, पावसाळी टोप्या आणि स्वेटर्सचाही समावेश आहे.

जून महिना हा पावसाळी वस्तू खरेदीसाठी सुगीचा महिना असतो. मात्र, जुलै हा महिनाही कोरडा गेला. खरेदी केलेला माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे. छत्रीदुरुतीचे काम करणाºया विक्रेत्यांनाही मंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

बोर्लीपंचतन शहरातील शिवाजी चौक, गणेश चौक या परिसरातील प्लॅस्टिक व पावसाळी गरजेच्या वस्तू विक्रे त्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. दिवसभर ग्राहक फिरकत नसल्यामुळे त्यांचाही रोजगार बुडाला आहे. पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे जर्किन्स आणि स्वेटर्सची सुमारे चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल थांबली आहे. आतापर्यंत दिसणाºया रंगबिरंगी छत्र्याही दिसत नाहीत. त्यामुळे छत्र्यांबरोबरच दुरुस्तीचीही कामे बंद आहेत. दरम्यान, पंख्यांची दुरुस्ती करणाºया विक्रे त्यांकडे मात्र उन्हाळ्याप्रमाणेच महिन्याला किमान दहा ते पंधरा पंख्यांच्या दुरुस्तीची कामे येत आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले.

छत्र्या दुरुस्ती करणारे कारागीर हवालदिल
पावसाळा सुरू झाल्यानंतर छत्र्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू होतात. एखाद्या ठिकाणी बसल्यानंतरही दिवसभर उठता येत नाही, एवढा हंगामी व्यवसाय मिळतो. मात्र, यावर्षी घरोघरी फिरूनही कोणीही दुरुस्तीचे काम दिलेले नाही. त्यामुळे छत्री दुरुस्तीचा हंगामी व्यवसायही करता आलेला नाही, असे छत्री दुरुस्ती करणारे सांगतात. जून महिन्यात खरेदीसाठी दुकानात तुडुंब गर्दी होते. यंदा मात्र एखाद-दुसरे ग्राहक येत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकूण व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला आहे, असे दुकानदारांनी सांगितले.

वातावरणात बदल दिसत असून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर बोर्लीपंचतन परिसरात पाऊस सुरूच असल्याने पुढे व्यवसायात नक्की वाढ होण्याची शक्यता आहे. - राजकुमार, दुकानदार, बोर्लीपंचतन

Web Title: Demand for rainy season slowed down business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस