लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील महसूल विभागांतर्गत येणाऱ्या मंडळाधिकारी व तलाठी सजामधील कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले मिळण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी वरंध जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य मनोज काळीजकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.महाड तालुक्यातील खरवली तलाठी सजा, वरंध तलाठी सजा, भावे तलाठी सजा, कसबे शिवथर तलाठी सजा या ठिकाणी तलाठी पदे रिक्त असल्याने शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. महाड तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती प्रसंगी बाधितांच्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होत आहे, त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्यास अडथळा येत असल्याचे काळीजकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करून रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत माहिती व योग्य कार्यवाहीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आ. भरत गोगावले, प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे दिली.
महाडमधील तलाठ्यांची पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:23 AM