कर्जत : तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर सरपंचांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. उपसरपंच हे मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच अधिकाराचा दुरु पयोग करतात, त्यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही म्हणून त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला होता. तो मंजूर झाल्याने उपसरपंचांना पायउतार व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला.कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सहा सदस्य शिवसेनेचे आहेत, तर तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या यमुना गणपत होला तर उपसरपंचपदी शिवसेनेचे दीपक राम नांगरे विराजमान होते. उपसरपंच दीपक नांगरे मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच अधिकाराचा दुरु पयोग करतात, त्यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही म्हणून त्यांच्या विरु द्ध सरपंच यमुना होला यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावामध्ये शिवसेनेच्या पाच तर राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी यमुना होला, शेवंता पवार, महादू उघडा, नंदा झोरे, शशिकला देशमुख, संगीता ढाकोळ, संजय धामणसे हे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
उपसरपंचावर अविश्वास ठराव
By admin | Published: August 13, 2015 11:24 PM