विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:04 AM2019-11-04T02:04:16+5:302019-11-04T02:04:40+5:30

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई : तीन महिन्यांत ७६ केसेसमधून १,७४,८00 रुपये दंड वसूल

Depression among vehicle holders regarding insurance renewal | विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

Next

सिकंदर अनवारे 

दासगाव : कोणतेही छोटे किंवा मोठे वाहन असो त्याचा विमा असणे गरजेचे आहे. अपघातानंतर विम्यामुळे वाहनांची भरपाई व जखमी किंवा मृत्यू अशा सर्वांना याचा लाभ मिळतो. आज शेकडो वाहने विनाविमा काढत फिरत असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्या तपासणी कारवाई दरम्यान उघडकीस आले आहे.

नवीन वाहन असो, अगर जुने त्याच्या किमतीप्रमाणे त्याचा विमा काढला जातो. मात्र, वाहतुकीच्या नियमानुसार विमा असणे गजरेचे आहे. नसेल तर वाहतूक नियमांचे उल्लंघन असून कारवाईस पात्र ठरतो. कोणत्याही वेळी कोणत्याही वाहनाचे काही घडू शकते. कोणत्याही वाहनाचा अपघात होत असेल तर त्यानंतर विम्याचा फायदा वाहनमालक व अपघातामध्ये जखमी किंवा मृत्यू असलेल्या कुटुंबाला होतो. संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. ठिकठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी केली जात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र, नवीन कायद्याची अंमलबजावणी अद्याप महाराष्ट्रात झालेली नाही. आजही जुन्या कायद्याप्रमाणेच दंड वसूल केले जात आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत आठ महामार्ग वाहतूक पोलीस शाखा उभारण्यात आल्या आहेत. सध्या या शाखांवर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये वाहनांना बसवण्यात आलेल्या काळ्या काचा, सीटबेल्ट न घालणे, वाहनांचा विमा न काढणे, पीयूसी नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रेस अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्येक दिवशी या पोलीस शाखांमध्ये कारवाई केली जात असून, लाखो रुपये वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. एवढे होत असताना वाहनचालकांमध्ये आजही काही सुधारणा होत असल्याचे दिसून येत नाही. काही वाहनचालक वाहन कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. सध्या महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाई दरम्यान गेल्या तीन महिन्यांच्या वाहनांच्या तपासणीमध्ये ७६ वाहन विनाविमा सापडली. यांच्याकडून प्रत्येकी २३०० रुपयांप्रमाणे १,७४,८०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे.
कोणत्याही वाहनाचा विमा हा महत्त्वाचा आहे. अपघातानंतर वाहनाचे होणारे नुकसान व जखमी व मृत व्यक्तीस लाभ देण्यास विमा कंपनीच जबाबदार राहते. अगर वाहनाचा विमा नसेल तर अपघातग्रस्त वाहनमालकाला मृत्यू अगर जखमी व्यक्तीस कोर्ट ठरवून देईल तेवढी रक्कम अदा करावी लागते. यामध्ये जर अपघात करणाºया वाहनमालकाची ऐपत नसेल तर मात्र मृत्यू किंवा जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयास मदत मिळत नाही, त्यामुळे कायद्याने वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे.
 

Web Title: Depression among vehicle holders regarding insurance renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.