करंजा बंदरात पडीक मच्छीमार बोटीला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:39 PM2023-12-19T16:39:46+5:302023-12-19T16:40:13+5:30
आगीत मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मधुकर ठाकूर,उरण : करंजा बंदरात मागील तीन चार वर्षांपासून
अर्धवट बांधणीच्या अवस्थेत उभ्या असलेल्या एका फायबर बनावटीच्या मच्छीमार बोटीला मंगळवारी (१९) सकाळी अचानक आग लागली.या आगीत
मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
करंजा बंदराच्या ड्रायडॉकमध्ये मागील तीन चार वर्षांपासून दिपराज दत्ताराम नाखवा यांच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या फायबर मच्छीमार बोट.
अर्धवट अवस्थेत पडून आहे.मंगळवारी (१९) अचानक या अर्धवट पडून असलेल्या फायबरच्या बोटीला आग लागली.या आगीत फायबर बोटीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.सिडकोच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली खरी.मात्र फायबर मच्छीमार बोटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती करंजा बंदर निरीक्षक ए.एल.शिंदे यांनी दिली.