निधी असूनही काम नाही
By admin | Published: October 8, 2015 11:33 PM2015-10-08T23:33:32+5:302015-10-08T23:33:32+5:30
रायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेला निधी त्यांच्याकडून खर्च झालेला नाही. ग्रामपंचायतींच्या ढिसाळ कारभारामुळे एक कोटी २७ लाख २४ हजार ७५५ रुपयांचा निधी परत घेण्याची नामुष्की रायगड जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. जिल्हा परिषदेने निधी परत घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे.
संपूर्ण स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. यासाठी सरकारकडून दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांच्या निधीचीही तरतूद
झाली.
गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित निधी वर्ग करण्यात आला होता. त्यांनी ४० टक्के निधी वर्गही केला होता. मात्र ग्रामपंचायतींनी कमीअधिक प्रमाणात निधी खर्च केला.
शोष खड्डे, लिचपीट, गांडुळखत प्रकल्पासाठी शेडचे बांधकाम या निधीच्या माध्यमातून करायचे होते. मात्र ग्रामपंचायतींनी कामांमध्ये सातत्य ठेवले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींनी आपल्या अजेंड्यावर अद्यापही कचरा व्यवस्थापन हा विषय घेतला नसल्याने निधी प्राप्त होऊनही त्यावर चांगले काम होऊ शकले नसल्याने निधी काढून घ्यावा लागत आहे.
ग्रामपंचायतींना निधी देऊनही त्यांनी तो खर्च केलेला नाही. निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबतचे पत्र संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ज्या ग्रामपंचायतींनी काम केले नाही त्यांना समज देण्यात आली असल्याचेही साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायती : स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.
तालुका ग्रा.पं.निधी खर्च
माणगाव ०७४४,९५,९४४ १७,९८,३७५
अलिबाग ०३९,८३,७६१३,९३,५०४
महाड०३१८,५६,६७२७,४२,६६८
कर्जत ०२१६,५८,२४०६,६३,२९६
तळा ०१७,९९,३२०३,१९,७२८
खालापूर०१६,४०,०००२,५६,०००
पनवेल०३१२,८०,०००५,१२,०००
पेण ०३१८,०७,१८१७,२२,८७२
श्रीवर्धन ०४२५,४६,२१६१२,१०,४८४
मुरुड०२१५,९०,५२०६,३६,२०८
म्हसळा०१५,९०,०७०२,३६,०२८
रोहे ०२६,४०,०००२,५६,०००
उरण०२१०,४०,०००४,१६,०००
सुधागड ०१६,४०,०००२,५६,०००
पोलादपूर ०१६,४०,०००, २,५६,०००