- आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींना दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेला निधी त्यांच्याकडून खर्च झालेला नाही. ग्रामपंचायतींच्या ढिसाळ कारभारामुळे एक कोटी २७ लाख २४ हजार ७५५ रुपयांचा निधी परत घेण्याची नामुष्की रायगड जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. जिल्हा परिषदेने निधी परत घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे.संपूर्ण स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. यासाठी सरकारकडून दोन कोटी १२ लाख ७ हजार ९२४ रुपयांच्या निधीचीही तरतूद झाली. गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित निधी वर्ग करण्यात आला होता. त्यांनी ४० टक्के निधी वर्गही केला होता. मात्र ग्रामपंचायतींनी कमीअधिक प्रमाणात निधी खर्च केला. शोष खड्डे, लिचपीट, गांडुळखत प्रकल्पासाठी शेडचे बांधकाम या निधीच्या माध्यमातून करायचे होते. मात्र ग्रामपंचायतींनी कामांमध्ये सातत्य ठेवले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींनी आपल्या अजेंड्यावर अद्यापही कचरा व्यवस्थापन हा विषय घेतला नसल्याने निधी प्राप्त होऊनही त्यावर चांगले काम होऊ शकले नसल्याने निधी काढून घ्यावा लागत आहे. ग्रामपंचायतींना निधी देऊनही त्यांनी तो खर्च केलेला नाही. निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबतचे पत्र संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या ग्रामपंचायतींनी काम केले नाही त्यांना समज देण्यात आली असल्याचेही साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले.पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायती : स्वच्छ अभियानाअंतर्गत २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे रायगड जिल्हा परिषदेने पक्के केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. तालुका ग्रा.पं.निधी खर्चमाणगाव ०७४४,९५,९४४ १७,९८,३७५अलिबाग ०३९,८३,७६१३,९३,५०४महाड०३१८,५६,६७२७,४२,६६८कर्जत ०२१६,५८,२४०६,६३,२९६तळा ०१७,९९,३२०३,१९,७२८खालापूर०१६,४०,०००२,५६,०००पनवेल०३१२,८०,०००५,१२,०००पेण ०३१८,०७,१८१७,२२,८७२श्रीवर्धन ०४२५,४६,२१६१२,१०,४८४मुरुड०२१५,९०,५२०६,३६,२०८म्हसळा०१५,९०,०७०२,३६,०२८रोहे ०२६,४०,०००२,५६,०००उरण०२१०,४०,०००४,१६,०००सुधागड ०१६,४०,०००२,५६,०००पोलादपूर ०१६,४०,०००, २,५६,०००
निधी असूनही काम नाही
By admin | Published: October 08, 2015 11:33 PM