रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:03 AM2018-05-07T07:03:49+5:302018-05-07T07:03:49+5:30

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत.

Despite spending billions of rupees in Raigad district, water scheme is incomplete | रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच

रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच

Next

- अमुलकुमार जैन
बोर्लीमांडला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत.
अपूर्ण असलेल्या योजनांपैकी ३१ योजनांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळा हा कोरडा राहणार आहे. या योजनेतील तीनविरा, रेवस, उमटे, खंडाळा, ममदापूर आदी योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी काही देयके ठेकेदाराला देण्यातही आलेली
आहेत. मात्र, योजनेचा कालावधी उलटूनही ती अद्याप अपूर्णावस्थेत आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटावा, म्हणून शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत योजना कार्यान्वित केल्या आहेत. यापैकी काही योजना पूर्ण झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असला, तरी त्यातील काही योजनांमधून अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मात्र, ठेकेदाराला देयके मिळाल्याने काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बंदावस्थेतील पाणी योजना कधी पूर्ण होणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प, तीनविरा जलशुद्धीकरण प्रकल्प, रेवस ग्रामीण पाणी योजना, नेरळ येथील ममदापूर येथील पाणी योजना या प्रमुख पाणी योजनांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प योजना राबविण्यात आली असली, तरी या योजना कार्यान्वित झाल्या नसल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी ६० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडून एक ते दोन कोटींचा निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे योजना पूर्ण करण्यास निधीची कमतरता भासत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांचे म्हणणे आहे.
उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी तर तीनविरा धरणावरील अपुऱ्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी आवाज उठविल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम तालुकास्तरावर सुरू आहे. मात्र, योजना सुरू होऊनही अनेक ठिकाणी त्या अपुºया राहिलेल्या आहेत.

६० कोटींच्या तरतुदीची गरज
च्रायगड जिल्ह्यातील २९५ पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी १५ कोटी ९० लाख १५ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.
च्यापैकी १३ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी योजनांवर खर्च करण्यात आला आहे.
च्मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी अजूनही ६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील प्रगतिपथावर असलेल्या काही योजनांची कामे बंद असतील तरीही ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. निधीची कमतरता असूनही काम झालेल्या योजनेचे काम पाहून निधी वितरित करण्यात येईल.
- अदिती तटकरे, अध्यक्षा,
रायगड जिल्हा परिषद

Web Title: Despite spending billions of rupees in Raigad district, water scheme is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.