शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:40 AM

वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे.

मधुकर ठाकूरउरण : वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागील ३५ वर्षांपासून उरण परिसरात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, वायू विद्युत केंद्र, बीपीसीएल या केंद्र-राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या विविध प्रकल्पांवर आधारित अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. जेएनपीटी परिसरात तर ५०० हेक्टर क्षेत्रात मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत, तर आणखी उभारले जात आहेत. मात्र, बंदरातील जहाज वाहतूक, तेल आणि रासायनिक कंपन्यांमुळे परिसरात जल, वायुप्रदूषण वाढले आहे.जेएनपीटी आणि या बंदरावर आधारित असलेल्या अन्य दोन बंदरातून दरवर्षी सुमारे ५० लाख कंटेनर मालाची जहाजातून वाहतूक केली जाते. चौथे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कंटेनर हाताळणीची क्षमता एक कोटीच्या घरात पोहोचणार आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कंटेनर मालाच्या आयात-निर्यातीसाठी जगभरातून मालवाहू जहाजे जेएनपीटी बंदरात येत असतात. जहाजातून केरकचरा, वापरून झालेले काळे तेल बंदी असतानाही चोरीछुपे समुद्रात सोडले जाते, त्यामुळे समुद्रात जलप्रदूषण होत आहे. परिसरातील रासायनिक कंपन्यांमधून सोडण्यात येणाºया प्रदूषित रसायनमिश्रित सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. रसायनमिश्रित दूषित सांडपाणी नाल्यातून समुद्र, खाड्यांत मिसळत असल्यानेही जलप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ओएनजीसी प्रकल्पातून हायड्रोजन सल्फाइड (एचटूओ) हा विषारी वायू हवेत सोडला जात असल्याने लगतच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा वायू हवेपेक्षा जड असल्याने खालीच राहतो, त्यामुळे नागाव, म्हातवली, उरण, चाणजे, केगाव आदी गावातील नागरिकांना श्वसनाच्या अनेक व्याधीने ग्रासले आहे.प्रदूषणाचा फटका परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल आणि विहिरींनाही बसला आहे. विहीर आणि बोअरवेलच्या पाण्याला उग्र दर्प येत असून, पाण्यावर तेलतवंग दिसू लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डोंगरातून येणारे पाण्याचे झरेही दूषित झाले आहेत, त्यामुळे नागाव-म्हातवली परिसरातील विहिरी, बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा खटाटोप कंपन्या आणि प्रकल्पांकडून केला जात असला तरी झाडे लावण्याचे आणि जगविण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मागील अनेक वर्षांपासून विकासाच्या नावाखाली दगड-मातीच्या भरावासाठी डोंगर पोखरून भुईसपाट केले आहेत, त्यामुळे झाडे, झुडपे, वनराईच नष्ट झाली आहे. त्याचा दुष्परिणामही प्रदूषणवाढीत झाला आहे. जलप्रदूषणामुळे समुद्र, खाड्यांतील मासेमारीही संकटात सापडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही परिसरातील वाढत्या प्रदूषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.महिनाभरापूर्वीच माझी याठिकाणी नियुक्ती झाली आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करून त्यानुसार दोषी कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल.- राहुल मोटे,उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pollutionप्रदूषणRaigadरायगड