शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:25 AM

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि गादीचे वारस असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक तालुक्यातील गांगवली या जन्मगावामध्ये उभारले जावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. माणगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगवली गावामध्ये महाराणी येसूबाईंच्या पोटी १८ मे, १६८२ या दिवशी थोरल्या शाहू महाराजांचा जन्म झाला, असा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.गांगवली गावच्या हद्दीत तोंडलेकरवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी, मोकाशीवाडी, खरबाचीवाडी अशा पूर्वापार वाडत्ता आहेत. कुंभारवाडीतून साळवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुप्रसिद्ध वैजनाथ महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणाºया वैपूर्णा नदीवर नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधलेला फरसबंद नदीघाट आहे, तर पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात. मंदिराच्या समोरच चिरेबंदी वाड्याच्या खाणाखुणा आजही दिसतात.छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाऱ्यांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो. परंतु अशा या ऐतिहासिक भूमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे, अशी मागणी गांगवली येथील ग्रामस्थांकडून होत आहे. पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष देऊन संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आाहे. अनेक नागरिकांना या प्राचीन वास्तूबाबत माहिती नसल्याने येथे माहिती फलक लावावे. या वास्तूचे संवर्धन झाल्यास येथे पयटक नक्कीच भेट देतील.माणगावपासून राजधानी रायगडकडे जाणा-या मुख्य मार्गालगत असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख असलेला साधा माहितीफलक दिसत नाही.माणगाव तालुक्यात जन्म घेतलेल्या थोरल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळ परिसरात पूर्णाकृ ती मूर्ती स्मारक बनवावे, तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतातछत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाºयांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो.माणगावच्या पावनभूमीत अनेक शूरवीरांचा जन्म1शिवकालीन चिरेबंदी वाड्यावरच सन १९८० मध्ये रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अक्षरश: ओसाड अवस्थेत आहे.2माणगावच्या पावनभूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर, पायदळप्रमुख येसाजी कंक, सरखेल कान्होजी आंग्रेंचे विश्वासू सरदार खंडोजी माणकर यांसारख्या शूरवीरांचा जन्म झाला आहे.3याचबरोबर अठराव्या शतकातील आशिया खंडातील सर्वात ताकदवान अजातशत्रू सम्राट असं परकीय इतिहासकारांनी गौरविलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान मात्र उपेक्षितच राहिले आहे. कुशल प्रशासक, धोरणी राजा आणि स्वराज्याचे चौथे छत्रपती अशी ओळख असलेल्या महापुरुषांच्या जन्मगावात विदारक चित्र पाहायला मिळते .

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास