जास्त भरपाईसाठी प्रयत्नशील, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:26 AM2020-06-12T00:26:05+5:302020-06-12T00:26:34+5:30

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन : मुरूडमध्ये पाहणीदरम्यान नुकसानग्रस्तांनी मांडल्या व्यथा

Devendra Fadnavis's assurance to try for more compensation | जास्त भरपाईसाठी प्रयत्नशील, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

जास्त भरपाईसाठी प्रयत्नशील, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Next

आगरदांडा : निसर्ग वादळी वाऱ्यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. जीवितहानी जरी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील बागायतदार, मच्छीमार व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुरूड तालुक्याला भेट दिली. या वेळी बागायतदार, मच्छीमार व सामान्य नागरिकांनी आपल्या व्यथा फडणवीस यांच्यासमोर मांडून निवेदन दिले. आगामी पावसाळी अधिवेशनात निश्चित न्याय मिळवून देणार, असे आश्वासित के ले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुरूड तालुक्यातील काशीद सर्वे नांदगाव व राजपुरी कोळीवाडा परिसरास भेट देऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. बागायत जमिनींची पाहणी करून येथील नारळ, सुपारी झाडांची माहिती करून घेत बागायत जमीन मालकांचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे, शासनाकडून जास्तीतजास्त रक्कम बागायतदारांना मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजपुरी कोळीवाडा येथे जाऊन ज्या बोटी वादळामुळे फुटल्या आहेत, त्यांची पाहणी केली. राजपुरी कोळीवाडा येथील २४ बोटी, सागरकन्या सोसायटीच्या १५ बोटी, जय भवानी सोसायटीच्या २१ बोटी, बोरली व कोर्लई येथील प्रत्येकी तीन बोटी फुटल्याने येथील मच्छीमार चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या गरीब मच्छीमारांचे बोट फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आली. बोटींची प्रत्यक्ष पाहणी फडणवीस यांनी केली व मच्छीमारांच्या व्यथा ऐकून घेतल्या. या वेळी राजपुरी कोळीवाड्यात मोठी गर्दी पाहावयास मिळाली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते आदी उपस्थित होते.

मच्छीमारांना मिळावी नुकसानभरपाई
च्ज्या बोटी फुटल्या आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले व विजय गीदी यांनी केली व त्याबाबतचे निवेदनसुद्धा दिले.
च्तर अलका मोनाक यांनी राजपुरी येथे जेट्टीसाठी रक्कम मंजूर होऊनसुद्धा हे काम पूर्ण झाले नाही याबाबतचे निवेदन देऊन राजपुरी येथे जेट्टी व्हावी, अशी मागणी केली.
च्विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लोकांचे मनोगत ऐकून शासनाकडून निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासित केले.

चौलमध्ये झालेल्या नुकसानीची फडणवीस यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौलमधील शितळादेवी परिसरातील बागायतीची पाहणी गुरुवार, ११ जून रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पाहणी करीत असताना बागायतदारांनी विविध समस्या मांडल्या. दरम्यान, चौलमधील विश्वास जोशी यांनी पर्यटन व्यवसायावर झालेला कोरोनाचा परिणाम व आता निसर्ग चक्रीवादळात बागायतीच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावा, अशी दोन स्वतंत्र निवेदने दिली; तसेच अलिबाग तालुक्यातील बेलोशी व चिंचोटीमधील कुक्कुटपालन व्यवसायाला निसर्ग चक्रीवादळाने जमीनदोस्त केले आहे. त्यांना शासनाने योग्य ती नुकसानभरपाई घ्यावी, असे निवेदन कुक्कुटपालन व्यावसायिकांनी दिले.
मुरूडमधील नुकसानग्रस्त बागायतीची, शेतीची पाहणी करण्याआधी देवेंद्र फडणीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची चौल-पिरांचे देऊळ
भागातील निवासस्थानी सदिच्छा भेट
घेतली.

Web Title: Devendra Fadnavis's assurance to try for more compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.