पेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघात आ. धैर्यशील पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे सादर केला.ढोल-ताशाच्या गजरात शेकापच्या समर्थक कार्यकर्त्यांसह रायगड बाजार येथील शेकाप कार्यालयातून मोठे शक्तिप्रदर्शन करीत धैर्यशील पाटील यांनी अर्ज भरला. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. सगळीकडे शेकाप व मित्रपक्षांचे झेंडे फडकत होते. त्यानंतर संपूर्ण पेण शहरात मिरवणुकीद्वारे सुरुवातीलाच शक्तिप्रदर्शन केले. या वेळी राष्टÑवादीचे आ. अनिकेत तटकरे, शेकापचे चिटणीस दिनेश पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती प्रमोद पाटील, पेण ता. राष्टÑवादीचे अध्यक्ष दयानंद भगत आदी उपस्थित होते.पनवेलमध्ये शेकापचा उमेदवारी अर्ज दाखलपनवेल : विधानसभा मतदारसंघात शेकाप मित्रपक्षाच्या वतीने हरेश केणी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शेकापच्या पनवेल शहरातील जनसंपर्क कार्यालयाजवळून रॅली काढण्यात आली होती. खटारामधून केणी व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. पनवेलमध्ये भाजप विरुद्ध शेकाप अशी मुख्य लढत होणार आहे.पनवेलमधून सेनेचे बबन पाटील यांनी भरला अर्जपनवेल : सेना-भाजपमध्ये युती झाली असली तरी विविध मतदारसंघात सेना-भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पनवेलमध्ये युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात सेनेने बंडखोरी करीत बबन पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.लोकसभा निवडणुकीत हातात हात घालत प्रचार करणाºया सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. उरणमध्ये भाजपचे जिल्हा चिटणीस महेश बालदी यांनी सेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्याविरोधात बंडखोरी केल्याने शिवसेनेने पनवेल विधानसभा मतदारसंघात त्याचा बदल घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याकरिता शुक्रवारी सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. या वेळी संपर्कप्रमुख दत्तादळवी हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते.सेनेचे महेंद्र थोरवे यांचा अर्ज दाखलकर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये ४ आॅक्टोबर रोजी शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महेंद्र थोरवे यांनी ४ आॅक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दहीवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरून प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. रॅलीत ढोल-ताशासह युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्याकडे महेंद्र थोरवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे नेते पुंडलिक पाटील, वसंत भोईर, शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, सुनील पाटील, आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल डाळींबकर आदीसह युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.