- शशिकांत ठाकूर
कासा : जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातील धामणी धरणवीज बिल थकल्याने दीड महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे कासा भागात सतत भूकंप होत असताना धरणाची सुरक्षा वाºयावर आहे.
जलसंपदा विभागाने थकीत फरक वीज बिल न भरल्याने ३ जानेवारी पासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत धामणी धरणावरील विद्युत मीटरील मिटरिंग युनिट मध्ये बिघाड होता. ते लोड देऊन त्याचे दोन किट फोलटी असलेले बदलले. या काळात जलसंपदा विभागाने त्यांना सरासरी अंदाजे मासिक वीज बिल दिले जात होते व ते भरलेही होते. मात्र, सप्टेंबरमध्ये मिटरिंग युनिट व्यवस्था सुरळीत झाल्याने सदर काळात अधिक वापर केलेल्या युनिटचे दोन वर्षाच्या फरक बिलासह जलसंपदा विभागास आॅक्टोबर २०१८ या महिन्यात ९ लाख ७६ हजार वीजबिल पाठविले त्यांपैकी २ लाख ४८ हजार वीजबिल भरले.
परंतु सर्वच फरक न भरल्याने पुढील नोव्हेंबरमध्ये ७ लाख ७२ हजार, डिसेंबर ८ लाख २३ हजार आणि जानेवारी महिन्यात ८ लाख ५६ हजार पाठवले. या मध्ये तीन महिन्याचे २ लाख ५६ हजार व ६ लाख फरक होते. त्यातच थकीत बिल न भरल्याने ३ जानेवारीला वीजपुरवठा खंडित केला. परंतू याबाबत जलसंपदा विभागाकडे विचारणा केली असता आम्हाला प्रत्येक मिहन्याला साधारण १ हजार युनिटसह पावसाळा वगळता ३५ ते ४० हजार दिले जात होते मात्र मिटरिंग युनिट फोलटी मुळे दोन वर्षांचे फरक बिल एकदाच आॅक्टोबर ६५ हजार ८९३ युनिटसह ९ लाख ७६ हजार दिले. त्यास वरिष्ठ पातळीवर मंजुरी लगेच कशी मिळेल. त्याचा मंजुरी साठी प्रस्ताव पाठवला आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे धरण परिसरतील कासा जवळपास गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन एकीकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देत असताना जलसंपदा विभागातील अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे धामणी धरण गेल्या दीड महिन्या पासून अंधारात आहे. धरणाच्या ठिकाणी पोलिस व जलसंपदा विभागाचे कर्मचारी असले तरी वीज नसल्याने अंधारात हलचालींवर लक्ष ठेवणे कठीण बनले आहे.
धोकादायक परिस्थितीया धरणातून उन्हाळ्यात डहाणू, पालघर व विक्र मगड तालुक्यातील सुमारे १०० गावांना कालव्याअंतर्गत शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वसई विरार महापालिका, तारापूर टैप्स, तारापूर एमआयडीसी, रिलायन्स थर्मल पावर डहाणू, पालघर नगरपालिका, डहाणू नगरपालिका आदी ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.च्यातून जलसंपदा विभागाला दरवर्षी साधारणपणे १८ कोटीं रुपयांचा सिंचन महसूल मिळतो. तसेच, शेती सिंचनातून वर्षापोटी पाच लाख रुपयांचा शेती सिंचन महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असून देखील थकित बील अभावी धरणावर दीड महिन्यापासून अंधार आहे व सरकारचे दुर्लक्ष आहे.
धामणी धरणावरी वीज बिल थकीत आहे. ते थकीत व चालू वीज बिल भरल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरू केला जाईल.- किरण नागावकरअधीक्षक अभियंता वीज वितरण पालघरधरणाची सुरिक्षतता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून वीज बिलासाठी निधी उपलब्ध झाला असून सोमवारी महावितरणकडे अदा केला जाईल व धरणावरील वीज सुरू होईल.- निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता सुर्या प्रकल्प