धोकादायक घागरकोंड झुलत्या पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:06 AM2017-07-28T01:06:11+5:302017-07-28T01:06:11+5:30

घागरकोंड झुलता पूल धोकादायक झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग महाडने या वृत्ताची दखल घेत तातडीने या पुलाची पाहणी केली

dhaokaadaayaka-ghaagarakaonda-jhaulatayaa-paulaacai-paahanai | धोकादायक घागरकोंड झुलत्या पुलाची पाहणी

धोकादायक घागरकोंड झुलत्या पुलाची पाहणी

googlenewsNext

पोलादपूर : घागरकोंड झुलता पूल धोकादायक झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग महाडने या वृत्ताची दखल घेत तातडीने या पुलाची पाहणी केली. उपअभियंता शिर्के यांनी स्थळाला भेट देऊन पूल धोकादायक असल्याचे फलक तातडीने लावले आहेत.
‘लोकमत’मध्ये या पुलाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलादपूर पंचायत समिती सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार, माजी सरपंच महेश दरेकर आदी लोकप्रतिनिधींनी घागरकोंड झुलत्या पुलाची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना पुलाची दुरु स्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

वाकण ग्रामपंचायत हद्दीतील सावित्री नदीवरील घागरकोंड झुलता पूल पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. हा झुलता पूल नायगरा धबधब्याची आठवण करून देणारा जलप्रपात पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. संबंधित खात्याने या पुलाची दुरु स्ती करून नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारून पेवर ब्लॉकचे पदपथ करण्याची मागणी नागरिक करत आहे.

Web Title: dhaokaadaayaka-ghaagarakaonda-jhaulatayaa-paulaacai-paahanai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.