महामार्गाच्या कामासाठी धार नदीचा पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:13 PM2020-02-11T23:13:40+5:302020-02-11T23:13:44+5:30

ग्रामस्थ संतप्त : वारे ग्रामपंचायतीच्या नोटिसीला केराची टोपली

Dhar river water source for highway work | महामार्गाच्या कामासाठी धार नदीचा पाणीउपसा

महामार्गाच्या कामासाठी धार नदीचा पाणीउपसा

Next

कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण ठेकेदार कंपनीकडून सुरू असून, या कामासाठी परिसरातील नदी नाल्यातून टँकरद्वारे पाणीउपसा सुरू केला होता. मात्र, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याकरिता स्थनिकांच्या मागणीनुसार कंपनीस पाणीउपसा थांबविण्यास सांगितले आहे. तरीही कंपनीने पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, ठोस कारवाईची मागणी होत आहे.


वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे कुरुंग मार्गावरील धार नदीच्या पात्रातून दोन-चार महिन्यांपासून महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी, नदीपात्रातील पाणीसाठा कमी होऊ लागला. या नदी परिसरातील आदिवासी बांधव या पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत. भाजीपाला लागवड करून आपली उपजीविका करत आहेत. त्याचप्रमाणे वन्यप्राणी, गुरांना उन्हाळ्यात याच पाण्याचा आधार आहे. मात्र, टँकरद्वारे होत असलेल्या बेसुमार पाणीउपशामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार हे निश्चित. याची दखल घेऊन वारे ग्रा.प. सरपंच योगेश राणे, उपसरपंच नीलेश म्हसे, पोलीसपाटील व ग्रामस्थांनी बैठक घेतली. या वेळी भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून हा पाणीउपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्या नोटिसीला केराची टोपली दाखवत ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता राजरोसपणे पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

रस्त्याच्या कामासाठी आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील नदीतून होणाºया पाणीउपशाने भविष्यात या पाण्यावर अवलंबून असणाºया आदिवासीवाड्यांना पाणीटंचाई जाणवू शकते. याचा विचार करता आम्ही ठेकेदार कंपनीस उपसा करण्यास रोखले आहे. मात्र, तरीही पाणीउपसा होत असेल तर ग्रामस्थांसह जागेवर जाऊन नदीपात्रात जाणारा रस्ता बंद करावा लागेल.


टँकरद्वारे बेसुमार पाण्याचा उपसा
च्महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. यासाठी ठेकेदार कंपनीकडून महामार्ग परिसरातील नैसर्गिक नदी-नाल्यातून टँकरद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू आहे.
च्त्यामुळे ज्या भागात पाण्यासाठी स्थानिक नदी-नाल्यांवर अवलंबून आहेत, तेथे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, याचा विचार करून वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग येथील धार नदीतील पाणीउपसा थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणी उपसा थांबविण्यास सांगितले होते.
- योगेश राणे, सरपंच, वारे ग्रामपंचायत
कर्जत मुरबाड रस्त्याच्या कामासाठी होत असलेला पाणीउपसा लक्षात घेता भविष्यात या भागात पाणीटंचाई येणार आहे, याकरिता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून या ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबवण्यास कळवले आहे. मात्र, नोटीस देऊनही पाणीउपसा सुरू असल्याचे समजते, त्यावर कारवाई केली जाईल.
- नीलेश म्हसे, उपसरपंच, वारे

ग्रामपंचायतीने नोटीस देऊन ही कंपनी आपली मनमानी करत आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या नदीचे पात्र कोरडे पडणार आहे. त्याचे परिणाम ग्रामस्थांसह वन्य प्राण्यांनाही भोगावे लागणार आहे. ग्रामपंचायतीने या विषयी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
- महेश रामचंद्र म्हसे, ग्रामस्थ

Web Title: Dhar river water source for highway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.