शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

धरमतरचे मच्छीमार न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: March 27, 2016 2:20 AM

डेन्रो, इस्पात, आताची जेएमडब्लू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीच्या धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेट्या व मालवाहू बार्जेसद्वार होणारी मालवाहतूक यामुळे धरमतर खाडीच्या

- दत्ता म्हात्रे,  पेणडेन्रो, इस्पात, आताची जेएमडब्लू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीच्या धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेट्या व मालवाहू बार्जेसद्वार होणारी मालवाहतूक यामुळे धरमतर खाडीच्या १३५ मीटर रुंदीचा मध्यवर्ती पट्ट्यात जलवाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पेण व अलिबाग तालुक्यातील ४८ गावातील ३,३३५ मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.मालवाहू बार्जेस व स्पीड बोटीची दिवसरात्र चालणारी रेलचेल, कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण, लाटांच्या प्रहारामुळे फुटणारे समुद्रतटीय खारभूमी, संरक्षक बंधारे, नापीक भातशेती अशा असंख्य समस्यांना न्याय मिळावा, यासाठी २००० सालापासून धरमतर खाडी संघर्ष समितीव्दारा कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे मच्छीमार कुटुंबीयांचा लढा सुरू ठेवला आहे. त्या लढ्याच्या आंदोलनाला अखेर यश लाभले असून महाराष्ट्र शासनाने बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै २०१४ शासन निर्णयानुसार समितीचे गठण केले आहे. डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छीमार शिक्षा संस्थान वर्सोवा - अंधेरी (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली ही समिती धरमतर खाडीचे प्रदूषण व बाधितांच्या समस्यांची तपासणी करून शासनास अहवाल देणार आहे.पेणच्या धरमतर खाडीकिनारी बसलेली २८ गावे व पलीकडची २० अलिबाग तालुक्यातील गावे एक जमाना असा होता की भातशेती, मिठागरे, मासेमारी या उपजत अशा व्यवसायांवर येथील स्थानिकांचा मजेशीर उदरनिर्वाह सुुरू होता. १८८५ साली डोलवी - वडखळ परिसरात मित्तल ग्रुपची इस्पात व निष्पान डेब्रो कंपनी आली. तर दुसऱ्या तटावर पीएनपी ही आ. जयंत पाटील यांची जेट्टी या कंपन्यांच्या जलवाहतुकीचा मोठा असर खाडीतील मच्छ व्यवसायावर झाला. तत्कालीन बंदरविकास मंत्री मीनाक्षी पाटील यांच्यामार्फत मच्छीमारांना आर्थिक भरपाईही मिळाली. मात्र या मदतीमध्ये अल्पप्रमाण व लाभार्थीची संख्याही मर्यादित असल्याने येथील स्थानिक मच्छीमारामध्ये असंतोष पसरून कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार आंदोलन १५ वर्षे सुरू आहे. यामध्ये बोटरोको आंदोलन इस्पात, तेव्हाची आता जेएसडब्लू स्टील कंपनी गेटरोको आंदोलन अशा २२ आंदोलनांचा समावेश आहे. सर्वसमावेशक समिती गठीतसमितीचे अध्यक्ष, डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छी शिक्षा संस्थान, वर्सोवा-अंधेरी, मुंबई याशिवाय मच्छीमार संघर्ष समितीचा एक प्रतिनिधी सदस्य रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी, सदस्य प्रादेशिक उपायुक्त मच्छी विभाग कोकण, मुंबई यांचा प्रतिनिधी सचिव, महाराष्ट्र पशु व मच्छी विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचा प्रतिनिधी सदस्य, रत्नागिरीचे माजी आ. सुरेंद्रनाथ माने सदस्य व साहाय्यक आयुक्त मच्छी व्यवसाय सदस्य सचिव अशा आठ सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. ही समिती येत्या काही दिवसांत खारभूमी बंधाऱ्याचे होणारे नुकसान, सांडपाणी, प्रदूषणाची तीव्रता यांचा अहवाल देणार आहे. भांडवलदारी कंपन्यांना स्थानिकांच्या इलाख्यातील समुद्र - खाड्या सरकारने दिल्याने येथील सामान्यांची रोजंदारी संकटात सापडली असून तब्बल ४८ गावांतील ३,३३५ कुटुंबांवर मासेमारीचे उत्पन्न दुरावल्याने १५ वर्षांच्या या मच्छीमार आंदोलनाच्या संघर्षाला आशादायक परिस्थिती या शासकीय कमिटीच्या गठणाने मिळाली आहे. आता या समितीच्या परीक्षणाकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.