जिल्ह्यात विविध महोत्सवांचा धूमधडाका
By Admin | Published: December 28, 2015 02:51 AM2015-12-28T02:51:09+5:302015-12-28T02:51:09+5:30
कर्नाळा स्पोर्टस अकादमीचे नाव आणि येथील खेळाडूंचे कर्तृत्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे.
पनवेल : कर्नाळा स्पोर्टस अकादमीचे नाव आणि येथील खेळाडूंचे कर्तृत्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. या यशाचे खरेखुरे श्रेय विवेक पाटील यांनाच जाते, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी काढले. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या १७व्या कला क्रीडा व सांकृतिक महोत्सावाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते .
विवेक पाटील यांनी पाहिलेले ‘मिशन २०२०’चे स्वप्न निश्चित पूर्ण होईल आणि टोकियोत होऊ घातलेल्या आॅलिम्पिकमध्ये या अकदामीचे खेळाडू पदक मिळवतील, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला. कार्यक्रमास शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक शंकरशेठ पाटील, रविशेठ पाटील आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, की पूर्वी महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील जनतेचा कल अधिक होता. परंतु तालुक्यात बाहेरून आलेल्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने हा महोत्सवात भारतीय एकात्मितेचे दर्शन घडते आहे.
१कर्जत : संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने कर्जत महोत्सव २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रतिमा भालोदकर या संकल्प ‘आजचा आवाज’च्या मानकरी ठरल्या आहेत. येथील पोलीस मैदानावर कर्जत महोत्सव २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे योगाभ्यास, प्राणायाम, मेडिटेशन व सकारात्मक जीवनशैली, योग यावर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कीर्तिमाला यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जी. डी. फाउंडेशन, खारघर यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची, विनोबा कर्णबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी तपासणी करून घेतली. रात्री संकल्प ‘आजचा आवाज’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गायक गौतम वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य जोशी, शोभा मित्रगोत्री, स्नेहा पिंगळे, माधवी मित्रगोत्री उपस्थित होते.
प्रतिमा भालोदकर यांनी बाजी मारून संकल्प ‘आजचा आवाज’च्या त्या मानकरी ठरल्या. व्दितीय क्र मांक मिळविला विनीत कांबळे, तर उत्तेजनार्थ पारितोषिके रोहित शिंगे आणि राकेश पवार यांनी मिळविली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणूून गौतम वैद्य यांनी यांनी काम पाहिले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन स्नेहा गोगटे आणि स्नेहा पिंगळे यांनी केले.
२दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे योगाभ्यास, प्राणायाम, मेडिटेशन व सकारात्मक जीवनशैली, योग यावर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कीर्तिमाला यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतरआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची, विनोबा कर्णबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी तपासणी करून घेतली.
३रात्री संकल्प ‘आजचा आवाज’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गायक गौतम वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी चैतन्य जोशी, शोभा मित्रगोत्री, स्नेहा पिंगळे, माधवी मित्रगोत्री उपस्थित होते. प्रतिमा भालोदकर यांनी बाजी मारून संकल्प ‘आजचा आवाज’च्या त्या मानकरी ठरल्या.