धोदानी बंधारा वाहू लागला
By admin | Published: July 30, 2016 04:30 AM2016-07-30T04:30:28+5:302016-07-30T04:30:28+5:30
राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला
अलिबाग : राज्यातील भीषण दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष यावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा राज्यातील पहिला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धोदाणी येथील बंधारा गतवर्षी बांधून पूर्ण झाला. यंदा त्यात सुमारे ३१.२१ टीएमसी जलसंचय झाला. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरून आता वाहत असून एक किमी परिसरातील भूजल पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना २६ जानेवारी २०१५ रोजी कार्यान्वित केली. या राज्यस्तरीय योजनेच्या शुभारंभाचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला. पनवेल तालुक्यातील धोदानी या शिवारात या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते झाली. आदिवासी लोकवस्तीच्या क्षेत्रातील धोदानी बंधाऱ्याकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष होते, परिणामी शासकीय यंत्रणा देखील येथे प्रभावीपणे कार्यरत होत्या.
धोदानी परिसरातील गट क्र मांक ३, ४ व ५ मध्ये एकूण तीन साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. हा बंधारा केवळ ९.९८ लाख
रु पये खर्चून अवघ्या ४१ दिवसात पूर्ण करण्यात आला. २६ जानेवारी २०१६ रोजी भूमिपूजन, २० फेबु्रवारी २०१५ रोजी प्रत्यक्ष कामास सुरु वात आणि ३१ मार्च २०१५ रोजी बंधाऱ्याच्या कामात अत्यंत गतिमानता येथे अनुभवास आली. बंधाऱ्याच्या बांधाची एकूण लांबी २० मीटर, उंची २.८० मीटर, पाणीसाठा उंची १.५ मीटर तर मुख्य बांधाचा पाया-रु ंदी ०.६० मीटर अशी आहे.
बंधारा पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी बंधारा पूर्ण क्षमेतेने भरल्यावर तत्कालीन पालक सचिव गौतम चटर्जी यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण झाले व पाणी अडविले गेले. त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.
जलसाठ्यामध्ये साधारणत: एक किलोमीटर परिसरातील जवळजवळ २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाला, फळपिके व चारापिके यांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परिसराचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास प्रारंभ झाला.
योजनेची उद्दिष्टे
पावसाचे पाणी अडविणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करु न पाणीपुरवठ्यात वाढ करणे.
भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या पण निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे वा वाढविणे.
अस्तित्वातील जलस्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जनजागृती, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश या अभियानाचा आहे.