खोपोली : खोपोली नगरपरिषदेने ८० लाख रु पये खर्च करून बांधलेले र. वा. दिघे स्मारक व सभागृह शुक्रवारी दिघेंच्या १२० व्या जयंतीदिनी बंदच असल्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या साहित्यप्रेमी नागरिकांचा हिरमोड झाला.र. वा. दिघे यांची जयंती गेली अनेक वर्षे रामनवमीला खोपोलीत साजरी केली जाते. १९९६ ला र. वा. दिघे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने रामनवमीच्याच दिवशी कोमसापच्या खोपोली शाखेची स्थापना झाली. ५ वर्षापूर्वी खोपोलीत र.वा. दिघे यांच्या नावाने स्मारक उभारण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ८० लाख रु पये निधी उपलब्ध करून दिला. स्मारक उभारल्यानंतर र. वा. दिघे यांची जयंती, पुण्यतिथी स्मारकात झाली पाहिजे अशी सामान्य नागरिक व साहित्यप्रेमींची अपेक्षा आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास भाजपाचे तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, शहर अध्यक्ष अॅड. विजय पाटणकर, आर.पी.आय. चे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, डॉ. सतीश देशमुख, दिलीप ओसवाल इ. साहित्यप्रेमी, नागरिक दिघे स्मारकाच्या ठिकाणी दिघेंना अभिवादन करण्यासाठी गेले असता, त्यांना स्मारक कुलूपबंद असल्याचे आढळले. तेथील कर्मचाऱ्याला फोन करून विचारले असता, त्याने आज सुटी असल्याचे सांगितले. शेवटी निराश कार्यकर्त्यांनी बाहेरून दिघेंना अभिवादन केले व ते निघून गेले. (वार्ताहर)र.वा. दिघे यांच्या जयंतीनिमित्त कोमसापने सायंकाळी कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे येथून पुढे दिघेंच्या जयंती व पुण्यतिथीला स्मारकामध्येच अभिवादन केले जाईल, याची काळजी नगरपरिषद घेईल.- दत्ता मसुरकर, नगराध्यक्ष
दिघेंच्या जयंतीदिनी स्मारक बंद
By admin | Published: April 16, 2016 1:12 AM