दिघी-म्हसळेतील खड्डे बुजवा

By admin | Published: June 11, 2017 03:09 AM2017-06-11T03:09:04+5:302017-06-11T03:09:04+5:30

माणगाव ते म्हसळा या राज्य मार्ग-९७ वरील खड्डे तत्काळ भरावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे म्हसळा पंचायत समितीचे माजी

Dighi-Mhale potholes | दिघी-म्हसळेतील खड्डे बुजवा

दिघी-म्हसळेतील खड्डे बुजवा

Next

म्हसळा : माणगाव ते म्हसळा या राज्य मार्ग-९७ वरील खड्डे तत्काळ भरावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिला.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व्ही. एन. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोर्टकडून चांढोरे ते दिघी या रस्त्यासाठी एकूण १३२ लाखांचा निधी आला आहे. त्यातून म्हसळा शहरातील रस्त्यासाठी १०० लाख आणि चांढोरे ते दिघी या ३६ कि. मी.मधील खड्डे भरण्यासाठी ३२ लाख खर्च केला गेला. एवढा प्रचंड प्रमाणात निधी खर्च होऊनही रस्त्यावरील खड्डे मात्र जैसे थे असल्याचे महादेव पाटील यांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनांची वाहतूक होत असल्यामुळे सातत्याने रस्ते खराब होतात, तसेच रस्त्याच्या कामात दर्जा नसल्यामुळे पर्यटकांना खड्ड्यांतूनच मार्ग शोधावा लागतो. म्हसळा बायपास रस्ता खूपच खराब झाला असल्यामुळे तो पूर्णपणे नवीन व्हावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. हे काम त्वरित न केल्यास उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात खड्डे तर पावसाळ्यात डबक्यांचा त्रास
रेवदंडा : शहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात खड्डे तर पावसाळ्यात डबक्यांचा स्थानिकांना त्रास होत असून, हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहे. ज्या रस्त्यावर शैक्षणिक संकुल आहे त्याच्या रस्त्यावर छोटी तळी साचली आहेत. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना पादचारी, तसेच विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. शिवाय, पर्यटनावर परिणाम होत आहे.

Web Title: Dighi-Mhale potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.