दिघीचा चिमुकला पंढरीच्या वारीत, सहा वर्षांच्या ‘ज्ञानराज’ची पाचवी पंढरीची वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:11 AM2019-06-28T02:11:23+5:302019-06-28T02:12:58+5:30

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणा-या आषाढी एकादशीमध्ये राज्यातून अनेक वारकरी एकत्र येतात. या वेळी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचा चिमुकला ज्ञानराज पाचव्यांदा पंढरीची वारी करत आहे.

Dighi's Small boy dhyanraj go Pandharpur wari | दिघीचा चिमुकला पंढरीच्या वारीत, सहा वर्षांच्या ‘ज्ञानराज’ची पाचवी पंढरीची वारी

दिघीचा चिमुकला पंढरीच्या वारीत, सहा वर्षांच्या ‘ज्ञानराज’ची पाचवी पंढरीची वारी

googlenewsNext

- गणेश प्रभाळे

दिघी : गेल्या वर्षापासून सहा वर्षांचा ज्ञानराज चालत वारी पूर्ण करीत आहे. त्याचे वडील हरिश दिघीकर म्हणतात, वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क दाखवणारी मुलं आजकाल तुम्हाला सापडतील, पण वडिलांची वारी करण्याची परंपरा श्रीतुकाबोरायांच्या उक्तीनुसार मिरासी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।। ज्ञानराजने त्यांच्यासोबतच स्वीकारली आहे याचा खूप आनंद होत आहे, असे सांगितले. वारीत पहिल्यांदा येणाऱ्या आपल्या आजोबांनाच ज्ञानराज मार्गदर्शन करतो. वारीत सकाळी लवकर उठावं लागतं. खूप चालावं लागतं असा आपला यापूर्वीचा अनुभव ज्ञानराज सांगतो.

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणा-या आषाढी एकादशीमध्ये राज्यातून अनेक वारकरी एकत्र येतात. या वेळी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचा चिमुकला ज्ञानराज पाचव्यांदा पंढरीची वारी करत आहे. यामुळे पंढरीची वारी, आहे माझ्या घरी असा भक्तिमय सूर हरेश दिघीकर यांच्या कुटुंबातील चिमुकल्याच्या पाचव्यांदा दिंडीत सहभागामुळे ऐकू येत आहे. दिघी येथील हरेश दिघीकर हे वारकरी आहेत. त्यांचा मुलगा ज्ञानराज दिघीकर सहा वर्षांचा असून तो यंदा पाचवी पंढरीची वारी करत आहे. दोन वर्षांचा असताना त्याने पहिली वारी आई हिरकणी आणि वडील हरेश यांच्यासोबत आईच्या कडेवर आणि वडिलांच्या खांद्यावर बसून केली. त्या वेळी थोड्याफार प्रमाणात चालला. दुस-या वारीत त्याचे चालण्याचे प्रमाण वाढले असून जास्तवेळ चालला तर थकल्यावर उचलून घेण्यास सांगतो. यावर्षी पाचव्यांदा वारी तो करत आहे.

या आषाढी वारीला या वेळी त्याची आजी लक्ष्मीबाई आणि सेवानिवृत्त आजोबा गजानन दिघीकर सोबत आहेत. यावर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन वारीला आला आहे. नुकतीच शाळा सुरू झाली आहे. दिघी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तो शिकत असून १२ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने वारीला सुट्टी घेतल्याची सांगून वर्गशिक्षिकांकडून वीस दिवसांचा अभ्यास करण्यासाठी वारीत घेऊन आलाय. मुक्कामाच्या ठिकाणी तो अभ्यास करतो.

आपल्या कुटुंबासोबत आळंदी ते पंढरपूर २३० किमीचे अंतर पायीप्रवास करत असताना या वेळी तो थकत नाही. १७ दिवसांत हे अंतर पायी चालतात. कोपरखैरणे येथील आदितवार महाराज दिंडी क्र.१८८ रथ यामध्ये तो गेली चार वर्षे सामील होत आहे. ऊन, पाऊस, वारा या सगळ्याचा तो आनंद घेत असताना या वेळी वारकरी वेशात चंदनाचा टिळा लावून पालखीसोबत वारीत सहभागी झाल्याने ज्ञानराज या चिमुकल्या वारकºयाने दिंडीतील भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

दिंडीत थकवा आला तरीही वारीतील लक्षावधी जनांचा प्रवाह एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो, असे ज्ञानराजचे वडील हरिश दिघीकर यांनी सांगितले. पंढरपूरची वारी म्हणजे वारक-यांच्या आयुष्यातील आनंदपर्वणीच असते. या आनंदयात्रेत माझं कुटुंब उत्साहाने, आनंदाने सामील होते. ते पुढे म्हणाले, वडिलांची परंपरा चालू ठेवणारा मुलगा म्हणजे ज्ञानराज.
 

Web Title: Dighi's Small boy dhyanraj go Pandharpur wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.