अलिबाग : पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल घेवून त्यांचा गौरव करुन त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, या भूमिकेतून रायगडचे माजी जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा मासिक गुन्हे परिषदेत सुरु केलेला पोलीस गौरव उपक्रम नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी देखील अखंड सुरु ठेवला आहे. मंगळवारी झोलेल्या पहिल्या जिल्हा मासिक गुन्हे परिषदेत जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांनी गौरव केल्याने पोलीस अधिकारी सुखावले. पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी मंगळवारी गौरव केलेल्या मध्ये खालापूर पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्हयाची दोन महिन्यांच्या आत उकल करुन आरोपीस अटक करु न त्यांच्याकडून तीन लाखाचा माल हस्तगत करणारे सहा.पोलीस निरीक्षक ए.एस.पवार, सहा.फौज एम.पी.खरे, पोलीस शिपाई आर.बी. चोगले, खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील आरोपीस अटक करु न १९ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करणारे पोलीस शिपाई एस.बी.शिंदे व पोलीस शिपाई जी.पी.पवार, मुरु ड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा सखोल व उत्कृष्ट तपास करुन महिला आरोपीस अटक करत तिच्याकडून २ लाख १५ हजारांचा माल हस्तगत करणारे पोलीस निरीक्षक आर. जी. भोसले, पोसई आर. एस. मोहिते, महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करणारे पोलीस हवालदार एस.एस.अष्टमकर यांचा गैरव करण्यात आला.रोहा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील डम्परच्या जीपीएस सिस्टमचा अतिशय कौशल्याने वापर करून गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक करत त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविलेल्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, सपोनि ए. टी. मेश्राम, पोहवा आर. डी. म्हात्रे, पो शि एस. आर. येवले, तर खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीला मध्यप्रदेशमध्ये जाऊन अटक करून त्यांच्याकडून २७ लाख १ हजार ३४९ रुपयांचा माल परत मिळविणारे सहा. पोनि आर.पी.पवार, पोशि एस.एम.खराडे, पोह एस.एच.शेवते, पोह एन.पी.मोरे, पोशि व्ही.के.चौगले यांचा ही यावेळी गौरव करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
अलिबागमध्ये कर्तव्यदक्ष पोलिसांचा गौरव
By admin | Published: January 25, 2017 4:57 AM