डिकसळ येथे भरिदवसा चोरी

By Admin | Published: August 18, 2016 04:42 AM2016-08-18T04:42:17+5:302016-08-18T04:42:17+5:30

कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण रस्त्यावरील डिकसळ नाक्यावर असलेल्या साई प्रेरणा मेडिकलमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. चोरांनी गल्ल्यातील पाच हजार

Diksal burglary burglary at | डिकसळ येथे भरिदवसा चोरी

डिकसळ येथे भरिदवसा चोरी

googlenewsNext

नेरळ : कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण रस्त्यावरील डिकसळ नाक्यावर असलेल्या साई प्रेरणा मेडिकलमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. चोरांनी गल्ल्यातील पाच हजार रु पये घेऊन पळ काढला असून नेरळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिकसळ नाक्यावर साई प्रेरणा मेडिकल आहे. येथे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास मेडिकलमध्ये दोन मुले आली. त्यावेळी मेडिकलमध्ये एक मुलगी होती. त्यांनी आम्हांला भिंतीवरच्या शोकेसमधील वस्तू पाहिजे असे सांगितले. त्यावेळी मुलगी वस्तू काढत असताना त्या मुलांनी गल्ला उघडून पाच हजार रु पये काढून घेतले. त्यानंतर ते तेथून पसार झाले. दुसरेध् गि-हाईक आल्यानंतर गल्ल्यात पैसे नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.फौ जी.ऐस.गिरी हे करीत
आहेत.
याआधीही डिकसळमध्ये अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डिकसळ नाक्यावर पोलीस चौकी उभारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक महिन्यांपासून होत आहे. तसा पत्रव्यवहारही नेरळ पोलीस ठाणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कर्जत, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आले आहे. परंतु अद्याप याची दखल न घेतल्याने चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे डिकसळ नाक्यावर लवकरात लवकर पोलीस चौकी उभारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Diksal burglary burglary at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.