अपंगत्वावर दीपकने केली जिद्दीने मात
By admin | Published: September 7, 2015 11:34 PM2015-09-07T23:34:52+5:302015-09-07T23:34:52+5:30
जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावरही कशी मात करता येवू शकते याची प्रचिती खालापूर तालुक्यातील आपटी येथील दीपक पाटील या तरु णाकडे पाहिल्यावर येते. जन्मापासून पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या
खालापूर : जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावरही कशी मात करता येवू शकते याची प्रचिती खालापूर तालुक्यातील आपटी येथील दीपक पाटील या तरु णाकडे पाहिल्यावर येते. जन्मापासून पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या दीपक पाटील यांनी आपल्या कलेने अपंगत्वावर मात केली असून दीपकच्या हातून साकारलेल्या मखरांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. गेली अनेक वर्षे मखर बनवून दीपकने खालापूरसह जिल्ह्यात आपले नाव केले आहे.
खालापूर तालुक्यातील आपटी गावात राहणाऱ्या दीपक पाटील यांना पोलिओमुळे अपंगत्व आले आहे. जन्मापासून दोन्ही पाय निकामी असलेल्या दीपकने आपण अपंग आहोत असा न्यूनगंड कधीच बाळगला नाही. पाय निकामी झाले असले तरी हात मात्र मजबूत असल्याने या हातांचा आधार घेत दीपकने विविध प्रकारच्या कलाकृती साकारल्या आहेत. गेली अनेक वर्षे गणपतीसाठी लागणारे थर्माकोलचे मखर दीपक पाटील साकारत आहेत. दीपकने बनविलेल्या आकर्षक मखरांना खालापूर तालुक्यासह कर्जत, पेण, सुधागड व पनवेल तालुक्यातही मोठी मागणी असते.
कार्लेखिंड : गणपती उत्सवासाठी पोयनाड बाजारात नवनवीन सजावटीच्या वस्तू दाखल झाल्यामुळे बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. गणपतीच्या आरासासाठी थर्माकोलचे मखर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. इकोफ्रें डली मखर हे सुद्धा उपलब्ध आहेत. या मखरांची किंमत एक ते पाच ते साडेपाच हजारांपर्यंत आहे. हल्ली वेळेअभावी सोपा मार्ग म्हणून मखर खरेदी करणे बहुतांश पसंत करतात. तसेच इलेक्ट्रीक तोरणे, बल्ब, एलईडी स्वरूपातील चायनीज लायटिंग, विविध प्रकारचे इलेक्ट्रीक साहित्य दुकानातून आहेत. प्लास्टिकच्या फुलांना मागणी वाढली आहे.