शिक्षकांच्या ओरडण्यातूनच मिळाली दिशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 02:34 AM2019-09-05T02:34:33+5:302019-09-05T02:34:39+5:30
क्रिडापट्टू घडवणाऱ्या सामान्य कुटुंबातील क्रिडा शिक्षक रेवप्पा गुरव यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे बिराजदार गुरुजी नवी मुंबई : क्रिडा शिक्षकांच्या ...
क्रिडापट्टू घडवणाऱ्या सामान्य कुटुंबातील क्रिडा शिक्षक रेवप्पा गुरव यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे बिराजदार गुरुजी
नवी मुंबई : क्रिडा शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्येही खेळासाठी दाखवलेला उत्साह, आणि त्यावेळी दुसºया शिक्षकाकडून बसलेला ओरडा यातूनच खेळाप्रती रुची वाढली आणि स्वत: देखिल क्रिडा शिक्षक बनू शकल्याची भावना महापालिकेचे क्रिडा अधिकारी रेवप्पा गुरव व्यक्त करतात. त्यांच्या घरची परिस्थीती सामान्यच, त्यातच वडिलही उत्तम खेळाडू व शिक्षक होते. यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना मिळतच गेले. त्यात पीटीचे शिक्षक शरणप्पा बिराजदार गुरुजी यांचा महत्वाचा वाटा असल्याची भावना रेवप्पा गुरव व्यक्त करतात. वडील शिक्षक असल्याने त्यांच्यात सामंजस्यपणाही तितकाच होता. यामुळे शिक्षण पूर्ण करुन पुढे काय?
याबाबत त्यांची कसलीच सक्ती नव्हती. मात्र एकदा बिराजदार गुरुची सुट्टीवर असल्याने पीटीच्या तासाला सुभाष हंडगे गुरुची वर्गावर आले. परंतु त्याच वेळी मी वर्गाबाहेर खेळण्यासाठी जात असताना, त्यांनी हाताला पकडून वर्गात आनले व तुझ्या हातात नेहमी चेंडू असतो, असा दम भरला. दुसरया दिवशी बिराजदार गुरुजींना हे समजले असता, त्यांनी टिकेकडे दुर्लक्ष करण्याचे सुचवत खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील कित्तेक वर्षे ते स्वत अनेकदा सोबतच क्रिकेट खेळले तर आग्रहाने त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग देखिल घ्यायला लावला. यामुळे खेळांविषयीचे आकर्षण अधिकच वाढत गेले, व त्यातुनच मी देखिल घडलो.
कडकडीत बंदीतही स्पर्धेच ठिकाण गाठतो तेंव्हा...
तत्कालीन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली त्याच्या दुसरयाच दिवशी सोलापुरमध्ये आमच्या तालुका स्तरीय स्पर्धा होत्या. परंतु सर्वत्र बंदी लागु झाल्याने स्पर्धेसाठी धोत्री गावातुन सोलापुर गाठणे काहीसे अवघड होते. अशावेळी शिक्षकांनी देखिल स्पर्धेला जाण्यास नकार दिला. परंतु केलेला सराव व्यर्थ ठरेल व काहीतरी करुन दाखवायची संधी हातुन निसटेल याची भिती होती.
त्यामुळे एका शिक्षकांची भेट घेवून त्यांना सोबत येण्याची विनंती केली. त्यांनीही होकार देत त्यांच्याच सायकलवरुन तसेच एका मोटरसायकलवर स्पर्धेच ठिकाण गाठल. यादरम्यान अनेक ठिकाणी पोलीसांनीही अडवून परत घरी जाण्यास सुचवले. मात्र प्रत्येकाची समजूत काढून पुढे जात राहिलो. अखेर स्पर्धेत सहभागी होवून ती जिंकली देखिल. या यशामुळे पुढे जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागाचे दार खुले झाले व त्यातही दाखवलेल्या कामगिरी मुळे एकावर एक संधी मिळत गेल्या व त्याच सोनं करत गेल्याने जे प्रोत्साहन मिळाल ते आजही प्रेरणादायी आहे.
शिक्षकच जेंव्हा मित्र बनतात...
एक शिक्षक ओरडल्यानंतर दुसरया शिक्षकाकडून विद्यार्थ्याची समजूत काढणे माझ्यासाठी अनपेक्षितच होते. त्यावेळी बिराजदार गुरुजींच्या माध्यमातुन मला मार्गदर्शक शिवाय चांगले मित्र म्हणुनही साथ मिळतच राहिली. त्यामुळे शालेय जिवणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करेपर्यंत त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळतच राहिले. व मी देखिल क्रिडा क्षेत्रातच नाव कमवणयचा निर्णय घेतला आणि तसेच पाऊल उचलत गेलो.