रायगड : जिल्ह्यातील नऊ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
By राजेश भोस्तेकर | Published: April 26, 2023 05:19 PM2023-04-26T17:19:57+5:302023-04-26T17:20:08+5:30
रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहा पोलीस निरीक्षक दीपक विष्णू मोरे यांच्यासह नऊ जणांना पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील सर्वोच्च पदक जाहीर झाले आहे.
अलिबाग : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांची २०२२ सालातील पोलीस महासंचालक पदक यादी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहा पोलीस निरीक्षक दीपक विष्णू मोरे यांच्यासह नऊ जणांना पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील सर्वोच्च पदक जाहीर झाले आहे. रायगड पोलीस दलातील पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
दीपक विष्णू मोरे यांच्यासह पोलीस उप निरीक्षक विशाल राजेंद्र शिर्के, सफौ दत्ता तुकाराम श्रीवर्धनकर, सफौ अंकुश सखाराम जाधव, सफौ सचिन दत्तात्रय वाणी, पोह प्रतीक सुभाष सावंत, मपोह जागृती सचिन पाटील, पोह परेश विलास म्हात्रे, पोह अरुण बाळकृष्ण घरत यांना पोलीस दलातील सर्वोच्च असलेले पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पदक प्राप्त अधिकारी, अंमलदार यांनी क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्हयाची उकल केली आहे. दोषीविरुध्द ठोस पुरावे जमा करून त्यांना गुन्हाचचा तपास लावलेला आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीवेळीही आपले कर्तव्य चोख बजावले आहे. या उल्लेखनीय उत्तम कामगिरी आणि प्रशंसनीय स्वरुपाचे अत्युत्तम काम केल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक पदक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च असे महत्वपूर्ण पदक जाहीर झाले आहे. पदक प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.