भिवपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

By admin | Published: April 10, 2017 06:00 AM2017-04-10T06:00:10+5:302017-04-10T06:00:10+5:30

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

Disadvantage of passengers at Bhivpuri railway station | भिवपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

भिवपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

Next

कांता हाबळे / नेरळ
मध्य रेल्वेच्या भिवपुरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, यासाठी अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांनी भिवपुरी रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्र ार केली आहे; परंतु आतापर्यंत रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सुटका व्हावी, म्हणून डिकसळ येथील ज्येष्ठ नागरिक गो. रा. चव्हाण यांनी पुन्हा एकदा या सुविधा सोडविण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन आणि खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन दिले आहे.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत रेल्वेस्टेशनच्या अलीकडे भिवपुरी रेल्वेस्थानक असून, या रेल्वेस्थानकात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते; परंतु या स्थानकात सोयी-सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत असून या परिसरात शाळा, महाविद्यालये, रु ग्णालये असल्याने या स्थानकातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ सुरू असते. असे असताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोयी-सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
भिवपुरी रेल्वेस्थानकात नवीन तिकीट खिडकी बंद, अपुरी निवारा शेड, अपुरी आसन व्यवस्था, अपंगाची मुतारी बंद, स्टेशन परिसरातील रस्त्यावर खड्डे, विद्युत दिव्यांचा अभाव, कर्जत एंडकडे इंडिकेटरची कमतरता, कचराकुंड्यांची कमतरता, रेल्वेस्टेशन बाहेरील रस्त्यावर पडलेले खड्डे, रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यावर दिव्यांची कमतरता, अशा अनेक समस्यांनी भिवपुरी स्थानकाला ग्रासले आहे. या स्थानकात अपंगांसाठी मुतारीचे बांधकाम केले आहे. तसेच नवीन तिकीट खिडकीचे काम केले असताना ही खिडकी व मुतारी अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. तर पावसाळ्यातही या स्थानकात अनेक अडचणी निर्माण होत असून, याअगोदर अनेक तक्र ारी करण्यात आल्या आहेत.
भिवपुरी रेल्वेस्थानकातील अनेक समस्यांबाबत स्टेशन प्रबंधक ए. एस. पांडीयन यांच्याशी चर्चा करण्यासाठी अनेक वेळा संपर्क करूनही संपर्क होऊ शकला नाही.(वार्ताहर)

उपाययोजनांची मागणी
प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या स्थानकात कोणतीही उपाययोजना नाही, तसेच आरपीएफची कमतरता असल्याचे स्थानिक प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. पादचारी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही अर्धवट असल्याने येथून चालणेही मुश्कील झाले आहे.
स्थानकात पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, अशा समस्या या स्थानकात आहेत. या समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक गो. रा. चव्हाण यांनी तक्रार के ली आहे; परंतु अनेक महिने उलटूनही या समस्यांचे निराकरण झाले नाही; परंतु या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.

भिवपुरी रेल्वेस्थानकावर अनेक समस्या असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्र ारी करूनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तरी प्रशासनाने नवीन तिकीट खिडकी आणि अपंगांची मुतारी सुरू करून अशा अनेक समस्या लवकर सोडवाव्यात.
-किशोर गायकवाड,
प्रवासी, डिकसळ
भिवपुरी रेल्वेस्थानकातील दिवेही लावण्यात येत नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारात यावे लागत आहे. रेल्वे स्टेशनला अपुरी निवाराशेड, अपंगांची मुतारी बंद, अपुरी आसन व्यवस्था अशा अनेक समस्या असल्याने त्याचा ज्येष्ठ नागरिकांसह, अपंग प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या स्थानकात योग्य त्या सोयी-सुविधा पुरवून गैरसोय दूर करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि भिवपुरी स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.
- गो. रा. चव्हाण
ज्येष्ठ नागरिक, प्रवासी डिकसळ

Web Title: Disadvantage of passengers at Bhivpuri railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.