अविश्वास ठराव फेटाळला

By admin | Published: January 9, 2017 06:31 AM2017-01-09T06:31:44+5:302017-01-09T06:31:44+5:30

आमटेम, (ता.पेण) ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत मोकल यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी मनमानी

Disbelief rejection of the motion | अविश्वास ठराव फेटाळला

अविश्वास ठराव फेटाळला

Next

नागोठणे : आमटेम, (ता.पेण) ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत मोकल यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी मनमानी कारभार आणि विकासकामांना अडथळा करीत असल्याचा आरोप करत २ जानेवारीला अविश्वास ठराव दाखल केला होता.
पेण तहसीलदार अजित नेराळे यांनी या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर विचार करण्याच्या अनुषंगाने आमटेम ग्रामपंचायतीच्या सर्व विद्यमान सदस्यांची विशेष सभा घेतली. या पंचायतीमध्ये ९ सदस्य असल्याने ठराव मंजूर होण्यासाठी ६ सदस्यांचे बहुमत असावे लागेल, हे तहसीलदारांनी प्रारंभीच स्पष्ट केले होते. मात्र, या सभेला एक सदस्य गैरहजर राहिल्याने ५ विरुद्ध ३ असे मतदान झाल्याने बहुमत सिद्ध होत नसल्याचे कारण देत तहसीलदार नेराळे यांनी अविश्वास फेटाळला असल्याचे जाहीर केले. मोकल यांचे उपसरपंच कायम राहिल्याचे जाहीर होताच आ. प्रशांत ठाकूर यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

Web Title: Disbelief rejection of the motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.