शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

भूमिगत केबलचा वाद चिघळला; महावितरण, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:16 AM

नेरळ - कळंब रस्त्यावरील भूमिगत विद्युतवाहिनीबाबत वाद चिघळला आहे.

नेरळ : नेरळ - कळंब रस्त्यावरील भूमिगत विद्युतवाहिनीबाबत वाद चिघळला आहे. प्रशासन शेतकरी व प्रवासी यांच्या जीवावर उठले असून ठेकेदार कंपनीच्या मनमानीविरोधात स्थानिक आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नसून नियमबाह्य कामास अधिकारी वर्गाचे अभय मिळत आहे. स्थानिकांच्या लेखी तक्रारीची दखल अद्याप घेतली नसल्याने महावितरण आणि बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.वरई येथील खासगी व्यावसायिक गृह प्रकल्पाकरिता स्थानिक प्रवासी व वाहनचालक यांचा जीव धोक्यात घालून भूमिगत विद्युतवाहिनी वारे येथील स्विचिंग स्टेशनपर्यंत नेली जात आहे.सुमारे 22 केव्ही इतक्या तीव्र क्षमतेची ही वाहिनी असल्याने काम सुरू करण्यापूर्वी प्रवासी, वाहनचालक, शेतकरी यांच्या सुरक्षेबाबत नियोजन करणे अपेक्षित होते.मात्र महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी प्रवाशांच्या सुरक्षेला तिलांजली देत या धोकादायक कामास परवानगी दिली आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी येथील स्थानिक समस्या लक्षात न घेता १२ जून २0१९च्या आदेशान्वये परवानगी दिली आहे. हा आदेश मोघम स्वरूपाचा असून त्यातील अटी व नियम शिथिल करण्यात आले आहेत.तर या परवानगीमध्ये सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच रस्त्यालगत भूभाडे भरून करण्यात यावे अशा आशयाची परवानगी दिलेली आहे.कंपनीने रस्त्याची साइडपट्टी खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान तर झाले आहेच पण शासकीय निधीतून लावलेली झाडे ,रस्त्यावरील झाडे तोडण्यात आलेली आहेत. रस्त्याची साइडपट्टी जेसीबी मशिनद्वारे पूर्ण खोदल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार रस्त्याच्या पृष्ठभागापासून १.६५ मी. इतक्या खोलपर्यंत खोदकाम न करता केवळ १ते २ फूट खोदून केबल टाकण्यात आलेली आहे. सदर खोदकाम केल्यानंतर मातीचा भराव न करता हे काम सिमेंट काँक्रीटचा भराव करणे आवश्यक होते पण तीदेखील काळजी कंपनीने घेतलेली नाही. हे काम क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करावयाचे आदेश असताना एकही अधिकारी कामाकडे फिरकला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेची दक्षता कंपनी घेत नसल्याने प्रवासी व शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.शासकीय अधिका-यांची नकारात्मक भूमिकामहावितरणचे उपअभियंता आनंद घुळे यांना शेतकºयांनी या कामात शेतकरी व प्रवासी यांच्या सुरक्षेची हमी तुम्ही देता का?असा प्रश्न विचारला तेव्हा कुणाच्याही सुरक्षेची हमी देणार नाही अशी प्रतिक्रिया मिळाली.पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीरपणे कंपनी काम करत असल्याने चिडलेल्या शेतकºयांनी नेरळ स्थानकाचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची भेट घेतली.सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणचे अधिकारी या धोकादायक कामात कंपनीची पाठराखण करत असतील तर आम्हाला नाईलाजास्तव कायदा हातात घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.पोशीर ग्रामस्थांच्या तक्रारींचे अवलोकन करून उप अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी महावितरणचे अभियंत्याला१२जून २0१९रोजी कंपनीला काम स्थगित करण्यात यावे असा आदेश दिलेला होता.२५जून २0१९रोजीच्या पत्रांन्वयेठेकेदार कंपनी नियम व अटींचे पालन करत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. नेरळ-कळंब रस्त्याच्या नूतनीकरण केलेल्या भागाचे नुकसान केल्याबद्दल १0 लाख इतक्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे.रस्त्याच्या साइडपट्टीवर इलेक्ट्रिक केबल टाकणे चुकीचे आहे. खोदाईमुळे ही साइडपट्टीवर कमकुवत होणार आहे. भविष्यात रस्त्याच्या साइडपट्टीवर टाकलेल्या इलेक्ट्रिक केबलमुळे शॉक लागून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकºयांचेही नुकसान होणार आहे, बांधकाम विभागाने दिलेली परवानगी चुकीची आहे. त्यामुळे महावितरणने ही केबल टाकताना वेगळा पर्याय काढावा, जे काम सुरू आहे ते चुकीचे आहे.- सुरेश लाड, आमदार-कर्जतठेकेदार कंपनी नियमांचे पालन करत नसल्याची ग्रामस्थ व शेतकरी आणि ग्रामपंचायत यांनी लेखी तक्रार केली असून सदर कामाची समक्ष पाहणी करण्यास संबंधित अधिकारी यांना सांगितले आहे. काम नियमबाह्य व धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस संरक्षण दिले जाणार नाही.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस स्थानकठेकेदार कंपनी व शासनाचे दोन्ही विभाग शेतकºयांच्या जीवावर उठले असून कुठल्याच प्रकारची सुरक्षा नाही. जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास संबंधित कंपनी व शासकीय अधिकारी जबाबदार असतील. तक्रारींची दखल न घेतल्यास आम्ही आंदोलनाचा निर्णय घेऊ.- तुषार राणे, शेतकरी,पोशीर

टॅग्स :Karjatकर्जत