नागोठणे : गुरव समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू खंडागळे यांनी नुकतीच शहरातील समाज बांधवांशी हितगुज साधून चर्चा केली. या बैठकीत समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर घेण्यात येणारा ३० मार्चचा मोर्चा, देवस्थान इनाम जमिनी, ओबीसी आरक्षण याबाबत चर्चा करण्यात आली.या वेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन रोहे तालुका अध्यक्षपदी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ रघुनाथ खंडागळे, तालुका महिला अध्यक्षपदी अनिता अरुण गुरव यांची, तसेच इतर पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली. या सभेला जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष विजय ठोसर, बंडू ठोसर, नंदकुमार गुरव, बाळासाहेब गुरव, मिलिंद गुरव आदींसह समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
गुरव समाजाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बैठकीत चर्चा
By admin | Published: March 27, 2017 6:13 AM