सरकारी रुग्णालयाला खासगी वाहनांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:29 AM2021-01-14T00:29:24+5:302021-01-14T00:29:37+5:30

जिल्हा प्रशासनाने कठाेर भूमिका घेण्याची मागणी

Dispose of private vehicles to government hospitals | सरकारी रुग्णालयाला खासगी वाहनांचा विळखा

सरकारी रुग्णालयाला खासगी वाहनांचा विळखा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
रायगड : अलिबाग येथील सरकारी रुग्णालयाला सध्या विविध वाहनांचा विळखा पडला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आतमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर पडणे कठिण तर आत जाणाऱ्यांनाही तेवढेच त्रासदायक ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत कठाेर भूमिका घ्यावी, अशी मागणी हाेत आहे.

अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पाेलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय अन्य महत्त्वाची सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, जिल्हा बँक अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत. कामानिमित्त येथे सातत्याने वर्दळ असते. त्याचप्रमाणे अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी माेठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असताे. जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ आहे, तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालयही रुग्णालयाच्या समाेरच आहे. त्यामुळे या ठिकाणी वेड्यावाकड्या पद्धतीने वाहने पार्किंग करण्यात येतात. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारातच खासगी रुग्णवाहिकांचा गराडा २४ तास पडलेला असताे. रुग्णालयाच्या गेटसमाेरच माेठ्या संख्येने वाहने पार्किंग केल्याचे सर्रास पाहायला मिळते. नियमबाह्य पार्किंग केल्यामुळे रुग्णांना घेऊन एखादी रुग्णवाहिका आल्यावर तिला रुग्णालयाच्या आतमध्ये प्रवेश करताना अनेक अडचणी येतात, तर काही प्रसंगी रग्णवाहिका सरकारी रुग्णालयाच्या बाहेर पडतानाही बेकायदा पार्किंगमुळे अडकून पडतात.
रुग्णालयामध्ये  आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास इमारतीमधील नागरिक, रुग्ण, आराेग्य कर्मचारी, डाॅक्टर आतच अडकून पडू शकतात.  आतमध्ये मदत पाेचवतानाही फार अडथळे पार करावे लागणार आहेत. याबाबत सातत्याने सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, दिलीप जाेग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे यांच्यासह अन्य जागरुक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. 

n सरकारी रुग्णालयाच्या इमारतीवर काहीच वर्षांपूर्वी सुमारे ११ काेटी रुपये डागडुजीसाठी खर्च करण्यात आले हाेते. 
n इमारतीमध्ये जाण्यासाठी लिफ्ट (जी बरीच वर्षे बंद हाेती) जिने आणि रॅम्प (उतरते जिने) आहेत. त्यातील लिफ्टचा इतिहास पाहिला तर ती अधिक काळ बंद हाेती, जिने अरुंद आहेत, रॅम्पची पडझड झाली आहे.

वर्षभरात माॅकड्रील नाही
जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरात माॅकड्रील झालेले नाही. लवकरच अलिबाग नगरपालिका प्रशासनाशी बाेलून माॅकड्रील घेण्यात येईल. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागालाही याबाबत विनंती करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुहास माने यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Dispose of private vehicles to government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड