पराभूत उमेदवाराच्या नावाने लिंबू टाकल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:09 AM2021-02-10T00:09:49+5:302021-02-10T00:10:31+5:30

माणगावमधील हातकणंगले येथील प्रकार

Dispute over doing black magic with the name of the losing candidate | पराभूत उमेदवाराच्या नावाने लिंबू टाकल्याने वाद

पराभूत उमेदवाराच्या नावाने लिंबू टाकल्याने वाद

googlenewsNext

माणगाव : माणगाव तालुक्यातील हातकणंगले येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून वापरण्यात आलेले अंगारा, नारळ, लिंबूचा प्रकार संपतो ना संपताे तोच पराभूत उमेदवार व समर्थक यांच्या नावाने लिंबू प्रभागात टाकल्याने हे प्रकरण हातघाईवर आले.

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा पराभव व्हावा या हेतूने येथील दोन्ही गटांकडील उमेदवारांनी यंत्र तंत्र, भानामती, उमेदवाराच्या दारात लिंबू कापून टाकणे, नारळ फोडणे, गावाभर तांदूळ फेकणे, गल्लीबोळात अंगारा टाकणे असे प्रकार झाले असून ज्या उमेदवारांच्या नावाने भानामती करण्यात आली होती त्याच्यातून उतराई होण्यासाठी येथील एका गल्लीत पराभव झालेल्या उमेदवार व त्याचे समर्थक यांच्या नावाने लिंबू कापून फेकण्यात आले होते, हा प्रकार प्रभागात समजताच महिला भयभीत होऊन शिव्यांची लाखोली वाहू लागल्या. यामध्ये संशयित व्यक्तीच्या नावाने शिव्या दिल्याने त्याचे रूपांतर वादात झाले. वाद विकोपास जाताच दोन्ही गटांकडील नागरिक एकत्रित आल्याने बाचाबाची व हातघाईवर प्रकरण आले. दरम्यान, या ठिकाणी ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या समझोत्याने व हातकणंगले पोलीस स्टेशनचे अधिकारी येताच येथील वाद मिटविण्यात आले.

लज्जास्पद प्रकार, ग्रामस्थांचे मत
माणगाव या गावामध्ये प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तांदूळ, अंगारा, लिंबू कापून टाकणे, उमेदवारांच्या दारात मध्यान्ह रात्री नारळ फोडणे हे प्रकार अंधश्रद्धेतून केले जातात. गावात उमेदवाराच्या समक्ष हा प्रकार करणारी यंत्रणा असून माणगाव हे गाव पुरोगामी विचारांचे व शंभर टक्के सुशिक्षित तसेच शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे असून या गावात हे प्रकार म्हणजे लज्जास्पद असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Dispute over doing black magic with the name of the losing candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.