डिकसळ येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत डास!
By admin | Published: January 6, 2017 05:58 AM2017-01-06T05:58:15+5:302017-01-06T05:58:15+5:30
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी किशोर गायकवाड यांना सोमवारी दुकानातून खरेदी केलेल्या सिलबंद पाण्याच्या बाटलीत चक्क डास आढळून
नेरळ : कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी किशोर गायकवाड यांना सोमवारी दुकानातून खरेदी केलेल्या सिलबंद पाण्याच्या बाटलीत चक्क डास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अशा या बाटल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डिकसळ येथील रहिवासी किशोर गायकवाड यांनी सोमवारी दुपारी डिकसळ येथील महादेव वडापाव सेंटर व चायनीज कॉर्नर या दुकानातून डेली बेली ही एक बॉटल खरेदी केली; परंतु या बाटलीवरून सीलबंद पॅकिंग असताना त्या बाटलीच्या पाण्यात डास आढळून आला आहे. असे पाणी नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. असे असतानाही अन्न औषध प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. डेली बेली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत याअगोदरही ५ जुलै, २०१६ रोजी सीलबंद बाटलीत कचरा आढळून आला होता, असे असताना अशा डेली बेली बाटलीची विक्र ी राजरोसपणे सुरू आहे. अशा या डेली बेली कंपनीच्या माध्यमातून या सीलबंद भरलेल्या बाटलीत कचरा, डास अशा अशुद्ध पाण्याचा वापर केला जात आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्र ारी येत आहे; परंतु याकडे अन्न औषध प्रतिबंधक विभागाचे दुर्लक्ष होत असून, अशा अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या डेली बेलीच्या बाटलीवर असलेल्या कस्टमरकेअर नंबरवर संपर्क साधला असता ती बाटली कोणत्या दुकानातून घेतली आहे. त्याच्याकडून बाटलीचे बील आणि बॉटल घेऊन या, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)