शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आॅनलाइन पद्धतीने धान्याचे वितरण: ८३ पीओएस मशिन्स बंद; १,३५८ दुकानांना दिल्या होत्या मशिन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 4:11 AM

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्यांना आता आॅनलाइन पध्दतीने धान्याचे वितरण करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे

- आविष्कार देसाई ।अलिबाग : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्यांना आता आॅनलाइन पध्दतीने धान्याचे वितरण करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, परंतु रायगड जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३५८ दुकानांना पुरवण्यात आलेल्या पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशिन्सपैकी ८३ मशिन्स बंद पडल्या आहेत. त्यामुळे तेथील धान्य विक्र ी बंद पडली आहे.मुळातच रायगड जिल्ह्यामधील काही दुकानदारांनी आॅनलाइन धान्य विक्र ीला विरोध केला होता. त्यामुळे जिल्ह्यात निर्धारित वेळेनंतरच दुकानदारांनी आॅनलाइन धान्य विक्र ीला सुरु वात केल्याचे कोणीच नाकारू शकत नाही. प्राधान्य गटातील व अंत्योदय गटातील रेशनकार्डधारकांना आॅनलाइन पद्धतीने धान्याची विक्र ी केली जाणार आहे. सरकारच्या ‘धान्यपूर्ती’ या संकेत स्थळावरदेखील याची माहिती आहे. रास्त भावात उपलब्ध करून दिल्या जाणाºया धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून राज्य सरकारने पावले उचललीहोती.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत केले जाणारे रास्त भाव धान्य वितरण रेशनकार्डधारकांना आॅनलाइन पद्धतीने देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रेशन दुकानदारांच्या विरोधामुळे हा उपक्र म सुरू होत नव्हता. आता मात्र सरकारने याची कडक अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे.या संपूर्ण कामासाठी ओएएस कंपनीकडे जबाबदारी सोपवली आहे. इंटरनेट सुविधा, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या कंपनीची असणार आहे. प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानदाराकडे जे पॉइंट आॅफ सेल मशिन असेल. त्या मशिनमध्ये त्या दुकानाच्या अंतर्गत येणाºया प्रत्येक कुटुंबाची माहिती साठवून ठेवलेली असेल. त्या कुटुंबाला १२ अंकी ओळख क्र मांक दिला जाईल. हा क्र मांक टाकल्यावर मशिनवर कुटुंबातील प्रत्येकाचे नाव, त्यांना मिळणारे धान्य त्याची होणारी पूर्ण किंमत पटलावर येईल.कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने त्या मशिनवर अंगठा दाबल्यासच हे धान्य वितरीत करण्याची सुविधा मशिनमध्ये आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत मिळणार आहे. सध्या रोखीनेच हे धान्य विकण्यात येणार आहे. भविष्यात कॅशलेस विक्र ीदेखील करण्याची मुभा ग्राहकांना राहणार आहे.या धान्यविक्र ीची प्रत्येक दिवसाची नोंद आॅनलाइन पद्धतीने आपोआपच सरकार दरबारी होणार आहे. त्यामुळे दुकानदारांच्या व्यवहारावर करडी नजर राहणार आहे.रायगड जिल्ह्यात सुमारे एक हजार ३५८ रास्त भाव धान्य दुकाने आहेत. अंत्योदय योजनेचा लाभ मिळणारी सुमारे ७७ हजार कुटुंबे तर, प्राधान्य गटाच्या ग्राहकांची संख्या सुमारे १४ लाख ४० हजार आहे. अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबाला दरमहा २५ किलो तांदूळ ३ रु पये प्रतिकिलो व १० किलो गहू २ रु पये प्रतिकिलो दराने पुरवला जातो. तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तीमागे २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ उपलब्ध करून दिला जातो.आॅफलाइनमुळेच रेशनिंगच्या धान्यामध्ये काळाबाजार केल्याच्या घटना उघड झाल्यानेच सरकारने यावर उपाय म्हणून धान्याचे वितरण आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला होता. लाभार्थ्यांच्या हिश्श्याचे धान्य काळाबाजारात विकून मलिदा मिळवण्याची सवय लागलेल्यांना आॅफलाइन हा चांगला पर्याय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मशिनमध्ये बिघाड करून आॅफलाइन पध्दतीने धान्य विकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेनेही सजग राहणे गरजेचे आहे.आॅफलाइन पध्दतीने धान्य विक्रीआता सर्व प्राधान्य गटातील व अंत्योदय गटातील रेशनकार्डधारकांना आॅनलाइन पद्धतीने धान्याच्या विक्र ीला सुरु वात झाली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यासाठी सुमारे एक हजार ३५८ रास्तभाव धान्य दुकानासाठी पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी ८३ मशिन बंद पडल्या आहेत. त्यामुळे तेथील धान्य वितरणाला ब्रेक लागला आहे.लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आॅफलाइन पध्दतीने धान्य विक्र ीच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे दुफारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितेल. त्यांना मशिन्स बदलून देण्याची कार्यवाही सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.