जिल्हा प्रशासनाने घेतला समितीचा धसका
By admin | Published: August 12, 2015 11:39 PM2015-08-12T23:39:38+5:302015-08-12T23:39:38+5:30
जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी किती निधी आला, कोणकोणती कामे करण्यात आली, त्याचप्रमाणे आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाप्रकरणी प्राप्त झालेल्या पोलीस तक्रारी
- आविष्कार देसाई, अलिबाग
जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी किती निधी आला, कोणकोणती कामे करण्यात आली, त्याचप्रमाणे आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाप्रकरणी प्राप्त झालेल्या पोलीस तक्रारी या सर्वांचा आढावा अनुसूचित जमाती कल्याण समिती घेणार आहे. त्यामुळे अपडेट राहण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
समितीमध्ये सर्वपक्षीय १५ आमदारांचा समावेश असून आमदार रुपेश म्हात्रे हे समितीचे प्रमुख आहेत. समितीला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.
कामात जिल्हा प्रशासन गुंतले आहे. समितीला आवश्यक असणारी माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही तर त्या अधिकाऱ्याविरोधात हक्कभंगाचा ठपका ठेवण्याचा अधिकार समितीला आहे. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती १९, २० आणि २१ आॅगस्टला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. समिती रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, विविध नगर पालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठका घेणार आहेत.