रायगड - मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याबाबतच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने यु-टर्न घेतला आहे. पर्यटक व्यवसायिकांच्या मागणीनंतर प्रशासनाने बंदी आदेश मागे घेत. मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खुला केला आहे मात्र किल्ल्यावर एक दिवसात 400 पेक्षा अधिक पर्यटक जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पर्यटक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात अद्यापही काेराेनाचा प्रादर्भाव कमी झालेला नाही. त्यातच ब्रिटन देशामध्ये काेराेनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. भारतामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकामध्ये ताे आढळल्याने सरकार आणि प्रशासन चांगलेच सर्तक झाले आहेत. सध्या सर्वत्र सरत्या वर्षाला निराेप देण्याची आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. पर्यटनाला जाण्यासाठीचे प्लॅनिंगही तयार झाले आहे. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड श्रीवर्धन आणि माथेरान याठिकाणी माेठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. विशेष करुन मुरुड-जंजिरा किल्ला बघण्यासाठी पर्यटक माेठ्या संख्येने गर्दी करतात. काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत काहीच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटनासाठी 25 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 या कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेतला हाेता.
सरकारने काही व्यवसाय अटी शर्तीवर सुरु करण्यास परवानगी दिली असल्याचे जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांनी एका पत्राद्वारे प्रशासनाला कळवले आहे. या ठिकाणी पर्यटनावर आधारीत विविध व्यवसाय आहेत. त्यावरच तेथील नागरिकांचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे किल्लाच बंद केला तर पर्यकांची संख्या कमी हाेऊन त्याचा व्यवसायावर परिणाम हाेणार आहे. तसेच तेथील व्यावसायिकांनी काही पर्टकांकडून आगाऊ रक्कम घेतली आहे. तसेच त्यांनी ती विविध कारणांसाठी खर्च केली असल्याने परत करणे कठीण आहे. त्यामुळे किल्ला पुर्ववत सुरु करावा अन्यथा आम्हाला आंदाेलन करावे लागेल असा इशारा अब्दुलरऊप सिद्दीकी यांच्या शिष्ट मंडळाने प्रशासनाला दिला हाेता.
पर्यटन व्यवसायिकांचा राेजगार जाणार असल्याने त्यांच्यावर येणारी उपासमारीचे वेळ टाळण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी मुरुड-जंजिरा किल्ला सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी आधी दिलेले बंदीचे आदेश मागे घेतले आहेत. तसेच काेराना बाबतच्यानियमांचे पालन करावे, गर्दी करु नये, मास्क, सॅनिटायझर वापरावे, किल्ल्यावर मर्यादीत संख्येने पर्यटकांना साेडणे बंधणकारक केले आहे.