गणेश चोडणेकर अलिबाग : मुरुड-जंजि-यामधील असुविधांवर मंगळवारी ‘लोकमत’ने ‘मुरु डमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याची तत्काळ दखल घेऊन, मुरुड-जंजिºयामधील ही गंभीर परिस्थिती बदलण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून हाती घेण्यात येतील, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मुरुड-जंजिºयामध्ये येणाºया पर्यटकांना अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मुरुड नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटन माहिती केंद्र लवकरच स्थापन करण्यात येईल. त्याकरिता मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही निवेदन देणार असल्याची माहिती मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली आहे. सिद्दींच्या राजवाड्यावर खासगी मालकी हक्क असल्यामुळे त्याकरिता शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’ने पर्यटन सुविधा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद. पर्यटकांच्या सुविधांकरिता नगरपरिषद सर्व ते प्रयत्न करेलच; परंतु अन्य शासकीय यंत्रणांकडून सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे नगरपरिषदेच्या पर्यटन व नियोजन समितीचे सभापती पांडुरंग आरेकर यांनी सांगितले. वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम लवकर करणे आवश्यक आहे. जंजिरा किल्ला पाहायला जाणाºया पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित जेट्टीची आवश्यकता असून, जेट्टीचे रुं दीकरण व पर्यटकांसाठी निवारा शेड करणे आवश्यक असून, मेरीटाइम बोर्डाने याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे आरेकर यांनी सांगितले. किल्ल्यावर जाणाºया रस्त्यालगत असणारी संरक्षण भिंत केव्हाही कोसळेल, अशा अवस्थेत असल्याने तेथे अपघात होण्याचा संभव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संरक्षक भिंत तातडीने बांधण्याकरिता आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे सांगून दरम्यान पर्यटक आणि नागरिकांनी मुरुडच्या सुंदर समुद्रकिनाºयावर स्वच्छता राखावी, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे.मेरीटाइम बोर्ड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य आवश्यक‘लोकमत’ने मांडलेली समस्यांची वस्तुस्थिती शासनाने तत्काळ विचारात घ्यावी. जुन्या जेट्टीवर महिलांकरिता स्वच्छतागृह व चांगला रस्ता करणे गरजेचे आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्याकरिता डोंगरी येथील रस्त्याशेजारील डोंगरावर असलेले धोकादायक मोठे दगड सार्वजनिक बांधकाम खात्याने तत्काळ काढणे आवश्यक असल्याचे नगरसेवक विजय पाटील यांनी सांगितले. मुरुडचा सुप्रसिद्ध सिद्दी राजवाडा हा खासगी मालकीचा आहे; परंतु संबंधित मालकांशी चर्चा करून या राजवाड्याचे रूपांतर संग्रहालय (म्युझियम)मध्ये केले, तर येथील पर्यटनामध्ये मोठी वाढ होऊ शकेल. मुरुडच्या पर्यटन विकासाकरिता मेरीटाइम बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुरुडमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना लवकर करणार, जिल्हाधिका-यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:50 AM