बहुजन संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By admin | Published: February 9, 2016 02:23 AM2016-02-09T02:23:52+5:302016-02-09T02:23:52+5:30

रोहित वेमुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले विद्यापीठाचे कुलगुरू, मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर गुन्हा दाखल करावा, केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचा राजीनामा

District Collector's office collapses | बहुजन संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बहुजन संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Next

अलिबाग : रोहित वेमुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले विद्यापीठाचे कुलगुरू, मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर गुन्हा दाखल करावा, केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचा राजीनामा घेण्याता यावा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील स्थानिक नेत्यांची नि:पक्ष चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोचवण्याची विनंती बहुजन संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना केली.
रोहित वेमुलाच्या मृत्यूचा जाब विचारण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी जिल्ह्यातील बहुजन समाज प्रचंड ताकदीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याजवळ एकवटला होता. तेथून सकाळी साडेअकराच्या सुमारास मोर्चाच्या स्वरूपात जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. रोहित वेमुला अमर रहे... अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोर्चामध्ये विविध बहुजनवादी संघटना, त्यांचे प्रतिनिधी सामील झाले होते.
१८ जानेवारीला हैदराबाद येथील राष्ट्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याने अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. या अन्यायाविरोधात संघर्ष करताना विद्यापीठाचे कुलगुरू, मंत्री बंगारू दत्तात्रेय आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी अन्यायकारक वागणूक दिली. त्यामुळे रोहित अतिशय निराश झाला होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्ता करून जीवन संपवले. विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठामधून अशा अन्यायकारक घटना घडत आहेत. बहुजन विद्यार्थ्यांचे भविष्य नष्ट करण्याचा प्रयत्न देशातील व्यवस्थेकडून केला जात आहे.अशा घटनांना कायमचा पायबंद बसलाच पाहिजे, असे निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Collector's office collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.