कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात रु ग्णांचे हाल
By Admin | Published: March 25, 2017 01:33 AM2017-03-25T01:33:56+5:302017-03-25T01:33:56+5:30
कर्जत उपजिल्हा रु ग्णालय सुरू होऊन सुमारे १३ वर्षे झाली. अगदी अत्याधुनिक उपकरणे या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली
कर्जत : कर्जत उपजिल्हा रु ग्णालय सुरू होऊन सुमारे १३ वर्षे झाली. अगदी अत्याधुनिक उपकरणे या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली; परंतु योग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने केवळ सुसज्ज इमारत व उपकरणांकडे बघून रुग्ण बरे होत नाहीत. या रुग्णालयाचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी अनेक संस्था व राजकारण्यांनी धरणे, आंदोलने, उपोषणे केली; परंतु काहीच उपयोग झाला नाही. उलट वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी वाढतच आहे. याचा फटका एका ज्येष्ठ महिला रु ग्णाला व त्यांच्या नातेवाइकांना बसला आहे. या महिलेला तपासणीसाठी नेण्यात येणारी व्हीलचेअर तुटली आणि ती महिला रु ग्ण खाली पडली. याबाबत त्या रु ग्णाच्या मुलाने आरोग्यमंत्र्यांकडे तक्र ार अर्ज के लाआहे.
मुद्रे बुद्रुक गावात राहणारे विद्याधर सोनावणे यांनी आपल्या मातोश्री अतुबाई श्यामराव सोनावणे यांना आजारी असल्याने रात्री ११ वाजता कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले होते; परंतु त्यांना इंजेक्शन न दिल्याचे समजल्याने सोनावणे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्या वेळी आईला इंजेक्शन न देताही इंजेक्शन दिल्याची खोटी नोंद केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी डॉ. रामकृष्ण पाटील यांना विचारणा करण्यासाठी गेले असता, डॉ. पाटील वातानुकूलित खोलीत मद्यधुंद अवस्थेत गाढ झोपले होते. झोपमोड झाल्याने डॉ. पाटील यांनी सोनावणे यांच्याशी वाद घातला. डॉ. पाटील हे रुग्णांना किंवा नातेवाइकांना समाधानकारक उत्तरे न देता त्यांच्याशी वाद घालत असतात. असा अनुभव स्थानिक आमदार सुरेश लाड यांनाही यापूर्वी आला आहे.
या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून सोनावणे यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री प्रकाश मेहता, कोकण आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आदींना लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केला आहे. (वार्ताहर)