रोहा : पंजाब थायबॉक्सिंग असोसिएशन आणि थायबॉक्सिंग इंडिया फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एशिया थायबॉक्सिंग टाईटल कपचे पंजाब अमृतसर गव्हर्नर कन्या स्कूल पंजाब येथे आयोजन केले होते. या एशिया कपमध्ये रायगड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना भारतीय संघात खेळवण्यात आले होते. या संघापैकी रायगडच्या विद्यार्थ्यांनी चार सुवर्ण पदके, चार रजत पदके पटकावून भारताला विजेतेपद मिळवून दिले.या स्पर्धेत श्रेयस म्हसकर सुवर्ण पदक धाटाव, नुपूर मोरे सुवर्ण पदक सुतारवाडी, तेजस करंजे सुवर्ण पदक मेढा, परेश चिल्ले सुवर्ण पदक महाड, स्वप्नील सोनावणे रजत पदक महाड, रुपाल गोवर्धने रजत पदक मेढा, परेश हिरवे रजत पदक महाड आदी सहभागी झालेल्या स्पर्धकांनी पदके पटकाविली. या सर्व विद्यार्थ्यांना रायगड जिल्हा असोसिएशन आणि मुंबई विभाग असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सुरेश म्हसकर, रायगड कोच प्रशांत मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. सयद हमद, राजू चौरासी, वंदना पिंपळकर, प्रदीप शर्मा, नंदकुमार पाटील, राकेश म्हसकर यांनी एशियन पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धकांचे आ. अनिल तटकरे, आ. अवधूत तटकरे आदींनी अभिनंदन केले.
जिल्ह्याला चार सुवर्ण पदके
By admin | Published: August 10, 2015 11:45 PM