मुरुडमधील जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
By admin | Published: July 10, 2015 10:00 PM2015-07-10T22:00:32+5:302015-07-10T22:00:32+5:30
रायगड जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या येथील जिल्हा रुग्णालयाची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे रुग्णांचे आणि वैद्यकीय अधिकारी
जयंत धुळप, अलिबाग
रायगड जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या येथील जिल्हा रुग्णालयाची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे रुग्णांचे आणि वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांचे होणारे हाल या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी या रुग्णालयास भेट देवून साऱ्या दुरवस्थेची चक्क झाडाझडतीच घेतली.
जिल्हा रुग्णालयाकरिता शासनाकडून मंजूर करुन आणलेल्या पाच लाख रुपयांतून होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बांधकाम विभाग सहकार्य करीत नसल्याने कंत्राटदार कामे वेळेत पूर्ण करु शकत नसल्याने रुग्णांसह सर्वांनाच मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचेही या वेळी दिसून आले.
-----------
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाहुबली नागावकर, अलिबाग सार्वजन्ािक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कांबळे, अभियंता आर.आर.विडेकर, कंत्राटदार अमित नारे, सवाई पाटील, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र धिवरे, नेत्र रोगतज्ज्ञ डॉ.प्रीती प्रधान, मेट्रन जयश्री मोरे आदीं समवेत बैठक घेवून, रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी करुन निष्पन्न झालेल्या कमतरता तत्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
--------
बांधकाम विभाग महिनाभरात कामे पूर्ण करणार
नेत्र रूग्ण विभाग आणि परिचारिका वसतिगृहाची झालेली दुरवस्था तत्काळ करण्याचे सांगून येत्या महिनाभरात ही सारी कामे पूर्ण केल्यावर आपण पुन्हा येवून ती कामे झाली किंवा नाही याची खातरजमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
च्१२ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर वर्षाला दहा लाख रुपये खर्च करण्यात येतात परंतु स्वच्छता कंत्राटदारांचे हे कर्मचारी स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याने त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करुन घेण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयात सांडपाण्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर नाले व ड्रेनेजचे काम प्राथम्याने करण्याचे त्यांनी सूचित केले.
च्रुग्णालयातील सद्यस्थितील सर्व अपूर्ण असलेली कामे या महिन्यात पूर्ण करुन देण्याचे आश्वासन यावेळी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.कांबळे यांनी दिले.