जिल्हा रुग्णालयातील परिचारिका इमारतीचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:40 AM2017-11-21T02:40:32+5:302017-11-21T02:40:34+5:30

बोर्ली मांडला : जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या परिचारिका अभ्यासक्रम व हॉस्टेल इमारतीचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत राहिले आहे.

District hospital nurse building work incomplete | जिल्हा रुग्णालयातील परिचारिका इमारतीचे काम अपूर्ण

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका इमारतीचे काम अपूर्ण

Next

अमुलकुमार जैन 
बोर्ली मांडला : जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या परिचारिका अभ्यासक्रम व हॉस्टेल इमारतीचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत राहिले आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेले काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या इमारतीसाठी पूर्ण निधी सार्वजनिक बांधकामकडे असूनही ठेकेदाराने अजून काम पूर्ण केलेले नाही. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा रु ग्णालयात परिचारिका अभ्यासक्र म कोर्स शासनातर्फे घेतला जातो. त्याचबरोबर परिचारिका अभ्यासक्र मासाठी प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधाही जिल्हा रु ग्णालयात करण्यात येते. मात्र, जिल्हा रु ग्णालयात पूर्वी परिचारिका अभ्यासक्र म सुरू असलेली इमारत जुनी झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी शासनाकडे नव्या इमारतीसाठी निधी मागण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने नव्या परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेल इमारतीसाठी निधीची तरतूद केली. यामध्ये परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेलची नवी इमारत तळमजला व दोन मजले अशी रचना केली आहे. जिल्हा रु ग्णालयात जुनी ओपीडी सुरू असलेल्या इमारतीच्या जागेवर ही इमारत प्रस्तावित केली आहे. याबाबतची निविदा शासनाने सार्वजनिक बांधकाम मार्फत काढण्यात आली.
सार्वजनिक विभागाने निविदा काढून या कामाची वर्क आॅर्डर २७ आॅगस्ट २०१३ रोजी मंजूर करण्यात आली. परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेलसाठी २ कोटी २० लाखांची सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीस वर्कआॅर्डर देण्यात आली. या इमारतीचे काम २४ महिर्न्यंच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या इमारतीचा २४ महिन्यांचा कालावधी उलटून पुढील २ वर्षे उलटली, तरी काम अजून अपुरेच राहिलेले आहे.
आतापर्यंत २ कोटी २० लाखांपैकी १ कोटी ४ हजारांचे काम पूर्ण झाले असून ठेकेदारास हे बिल अदा केले आहे. असे सार्वजनिक बांधकामचे स्वीय सहायक अजय खोब्रागडे यांनी सांगितले.
त्याचबरोबर ठेकेदारास काम करताना रेतीची समस्या उद्भवली असल्याने काम अपुरे राहिले असल्याचे खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.
जिल्हा रु ग्णालयात परिचारिका अभ्यासक्र म कोर्ससाठी दरवर्षी ४० ते ५० विद्यार्थी प्रवेश घेतात. याच हेतूने नव्या इमारतीमध्येच अभ्यासिका वर्ग व हॉस्टेल सुविधा करण्यात येणार आहे. मात्र, शासनाने या इमारतीसाठी निधीची तरतूद करूनही ठेकेदारामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम अजून अपुरे राहिलेले आहे.
या इमारतीच्या अपुºया राहिलेल्या कामास जेवढा ठेकेदार जबाबदार आहे, तेवढाच सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या कामाचा कालावधी निघून गेला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम पूर्ण करण्याबाबत विचारणा का केली नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा रु ग्णालयात सुरू असलेले परिचारिका अभ्यासक्र म व हॉस्टेल इमारतीचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही इमारतीचे काम रखडलेले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार व तोंडी सूचना दिल्या आहेत. इमारतीचे काम लवकर पूर्ण व्हावे, जेणेकरून याचा वापर आम्हाला करता येईल.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकि त्सक

Web Title: District hospital nurse building work incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.